संशोधनात उल्लेखनिय कामगीरीबद्दल प्राध्यापकांचा गौरव


सोमेश्वरनगर :


बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयात शैक्षणीक वर्ष २०२०-२१ मध्ये राज्यस्तरीय पात्रता परीक्षा व संशोधन क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल 'फॅकल्टी एम्पाॅवरमेंट अँड डेव्हलपमेंट' विभागामार्फत प्राध्यापकांचा सत्कार करुन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन शरदचंद्र पवार इंजिनिअरींग अँड टेक्नाॅलाॅजी काॅलेजचे उपप्राचार्य व मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डाॅ.शरद गावडे हे होते.तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. धनंजय बनसोडे हे होते.

यावेळी आपल्या मनोगतात प्रा.डाॅ.शरद गावडे यांनी महाविद्यालयातील यशस्वी प्राध्यापकांचे कौतुक केले व संशोधन करत असताना संशोधक प्राध्यापकांनी त्यातील बारकावे समजावुन घेवुन संशोधनाचे काम प्रगतीपथावर कसे आणावे तसेच ते संशोधन यु.जी.सी.केअर लिस्ट मधील जर्नलमध्ये प्रकाशित करावे तसेच त्या  संशोधनाचा समाजाला कसा फायदा होईल याविषयी मार्गदर्शन केले.
 
यावेळी राज्यस्तरीय शिक्षक पात्रता परीक्षा (सेट) २०२० मध्ये यशस्वी झालेले प्रा.डी.व्ही.बनसोडे(इलेक्ट्राॅनिक्स) व प्रा. प्रिया राऊत ( केमीस्ट्री)
तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पी.एच.डी.प्रवेश परीक्षा (पेट- २०२१) उत्तीर्ण झाल्याबद्दल भौतिकशास्त्र विभागप्रमुख प्रा. पाचुकांत होळकर (फिजीक्स) व सहा. प्रा. ज्ञानेश्वर फाळके (मॅथेमॅटीक्स) यांना गौरवण्यात आले.
त्यानंतर सुक्ष्मजीव शास्त्र विभागप्रमुख प्रा.माधुरी भांडवलकर यांचा 'इंटरनॅशनल जर्नल ऑफ जोतिष रिसर्च" मध्ये एक आंतरराष्ट्रीय शोधनिबंध, प्राणीशास्त्र विभागातील प्रा. अपुर्वा ताम्हाणे यांचा ' उत्तर प्रदेश जर्नल आॅफ झुलाॅजी'  मध्ये एक शोधनिबंध. इलेक्ट्राॅनिक्स विभागातुन प्राचार्य धनंजय बनसोडे व प्रा. मृणाली चव्हाण यांचा 'पेन्सी इंटरनॅशनल जर्नल' या स्कोपस इंडेक्सड आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रत्येकी एक शोधनिबंध तसेच फिजीक्स डिपार्टमेंट मधुन विभाग प्रमुख प्रा. पाचुकांत होळकर यांचे 'इंटरनॅशनल जर्नल आॉफ इनोव्हेटीव सायन्स , इंजिनिअरींग अँड टेक्नाॅलाॅजी' या यु.जी.सी. केअर आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये एक शोधनिबंध व 'पेनसी इंटरनॅशनल जर्नल' या स्कोपस इंडेक्स्ड आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये एक रिसर्च पेपर व प्रा कय्युम आत्तार यांचा 'पेन्सी इंटरनॅशनल जर्नल' मध्ये एक व 'आय.जे.आय.एस.आय.टी.' या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये दोन शोधनिबंध प्रकाशीत झाल्याबद्दल सर्वांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे नियोजन व सुत्रसंचालन सहा.प्रा. प्राजक्ता अडसुळ यांनी केले तर आभार सहा.प्रा.सुनिता कदम यांनी मानले.यावेळी आय.क्यु.ए.सी. समन्वयक प्रा. विजय थोपटे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या