Breaking News

नगरमध्ये सहा दरोडेखोरांचा हैदोसअहमदनगर : अहमदनगरमधील पाथर्डी शहर हद्दीतील चितळे वस्तीवर सहा जणांनी दरोडा टाकला. यावेळी दरोडेखोरांनी तीन वयोवृद्ध नागरिकांना जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. सोन्याच्या दागिन्यांसह 20 हजार रुपयांची रोख रक्कम आरोपींनी लांबवली आहे.

लिंबाजी नाथ चितळे (वय 65 वर्ष), बाबुराव गुणाजी उळगे (वय 65 वर्ष) आणि कमलबाई लिंबाजी चितळे (वय 58 वर्ष) असं मारहाण झालेल्या वृद्ध व्यक्तींची नावं आहेत. दरोडेखोरांनी त्यांना कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केली. या मारहाणीत लिंबाजी नाथ चितळे हे गंभीर जखमी झाले असून अत्यवस्थ असल्याची माहिती आहे. जखमींच्या डोक्याला जबर मार लागला असून हात फ्रॅक्चर झाले आहेत. या प्रकरणी पाथर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.

शुक्रवारी मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास शेवगाव रोडवरील प्रेमश्री पेट्रोल पंपासमोर राहणाऱ्या लिंबाजी चितळे यांच्या घरावर सहा दरोडेखोरांनी दरोडा टाकला. दरोडेखोरांनी आधी बाहेर झोपलेल्या कमलबाई चितळे यांना जबर मारहाण केली. त्यानंतर घराचा दरवाजा तोडून घरात झोपलेल्या लिंबाजी चितळे, बाबुराव गुणाजी उळगे, लक्ष्मीबाई उळगे यांच्यापैकी लिंबाजी आणि बाबुराव यांना जबर मारहाण केली.

लक्ष्मीबाई उळगे (वय 60 वर्ष) यांच्याकडील गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, कानातील सोन्याचे दागिने दरोडेखोरांना काढून घेतले. त्यांना मात्र दरोडेखोरांनी मारहाण केली नाही.

Post a Comment

0 Comments