आळंदी :
कऱ्हाडकर मठातील श्रीमद भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताहाची बुधवारी सांगता झाली. सकाळी टाळ मृदंगाच्या निनादात 'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात भाविकांनी नगर प्रदक्षिणा केली. हभप गणेश महाराज यांचे काल्याचे कीर्तन आणि खादगावकर ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसाद होऊन सांगता झाली. तत्पूर्वी मंगळवारी सकाळी भजनी मंडळ प्रमुख वाल्मिक नरहरी फड यांच्या हस्ते ग्रंथ सांगता पूजा आणि हभप बापूसाहेब महाराज पंढरपूर यांची पूजेची कीर्तन सेवा झाली. हभप श्रीनिवास महाराज उखळीकर यांनी सप्ताहाचे आयोजन केले होते.
सप्ताहात सात दिवस हभप बाळासाहेब महाराज लटपटे यांनी भागवत कथा कथन करून भाविकांना भगवद भक्तीत तृप्त केले. तसेच दैनंदिन कीर्तन,भजन, हरिपाठ,काकड आरती,हरिजागर इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
0 टिप्पण्या