श्रीक्षेत्र कोरठणला चंपाषष्ठी महोत्सव उत्साहामधे संपन्न..


देवाला आल्यिवर निर्व्यसनी बनण्याचा संकल्प करा - नानजीभाई ठक्कर ठाणावाला. 

पारनेर :

 महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे कुलदैवत आणि राज्यस्तरीय 'ब' वर्ग तीर्थक्षेत्र असलेल्या श्रीक्षेत्र कोरठण खंडोबाला गुरुवार दिनांक ९ डिसेंबर  रोजी भव्य चंपाषष्ठी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.कोरठण खंडोबा मंदिराचा जीर्णोद्धार, शुद्ध चंपाषष्ठी दिनांक ५ डिसेंबर १९९७  रोजी प. पु. स्वामी गगनगिरी महाराज यांचे हस्ते, सुवर्ण कलशावरोहनाने करण्यात आला.त्यावेळी ३ लाखापेक्षा जास्त भाविकांचे उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. चंपासष्टीचे हे ४२ वे वर्ष आहे.या वर्षाचा भव्य चंपाषष्ठी महोत्सव कोरठण खंडोबा मंदिरामधे  भाविकांच्या उपस्थितीमधे संपन्न झाला.भाविकांनी दर्शनबारीमधे उभे राहुन कोरोनाचे पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत मनोभावे देवदर्शन घेतले.

       या चंपाषष्ठीला श्री खंडोबाचा मार्तंड भैरव अवतार प्रगट झाला व मनीमल्ल दैत्याचा संहार केला व सर्व देवदेवतांना वरदान लाभले म्हणून चंपाषष्ठी महोत्सवाचे महात्म्य खुप मोठे आहे.कुलधर्म, कुलाचार,तळी भांडार करण्याची खंडोबा भक्तांची प्रथा तेव्हापासुनच सुरु झाली.चंपाषष्टी पर्वणीमधे दिवसभरात लाखोंच्या संखेने खंडोबा भाविक उपस्थित राहतात.तोच अंदाज धरुन, देवस्थान तर्फे सर्व नियोजन करण्यात आले होते. या महोत्सवाच्या निमित्ताने चंपाषष्टी उत्सवात येथील श्री खंडोबा म्हाळसा घोड्यावरील भव्य पितळी मूर्ती मंदिराचा ६ वा वर्धापन दिन, आणि प. पु. स्वामी गगनगिरी महाराज मूर्ती, ध्यानमंदिराचा पाचवा वर्धापन दिन सोहळा संपन्न होत आहे. आज पहाटे ४ वा. श्रीखंडोबा मंगल स्नान, उत्सव मूर्तीचे सिंहासनावर अनावरण, साज शृंगार पूजा व आरती सकाळी ६वा. श्री खंडोबा अभिषेक पूजा, आरती, सकाळी ७ ते ९ वा. होमहवन यज्ञ सकाळी ८ ते १० वा शरद भागवत प्रस्तुत आनंद यात्री भक्ती भजन मंडळ, आळेफाटा यांचे संगीत भजन, गोरेगावचा दिंडी सोहळा, पिंपळगाव रोठा ते खंडोबा देवस्थान, सकाळी ११  वा. पासून महाप्रसाद वाटप चालु होते. सकाळी ११ वा. ह. भ. प. गजानन महाराज काळे ( श्री मल्हारी महात्म्य खंडोबा कथाकार ) यांचे सुश्राव्य हरि कीर्तन झाले.या कार्यक्रमाला भाविकांनी मोठी उपस्थिती दर्शविली होती. दुपारी १ वा. चांदीच्या पालखीतून शाही रथात चांदीच्या उत्सव मूर्तीची भव्य शोभा मिरवणुकीने मंदिर व कोरठण गड प्रदक्षिणा, दुपारी १ वा. नानाजीभाई ठक्कर ठाणावाला यांनी देवस्थानला भेट दिली. त्यांच्या हस्ते देणगीदारांचा सन्मान करण्यात आला. पालखीचे व्यासपीठावर आगमन, मान्यवरांच्या उपस्थितीत चंपाषष्टी महोत्सवाची महाआरती झाली. दुपारी १ वा. वाजल्यापासून श्री खंडोबा गाणी स्पर्धा, शाहीर स्वप्निल गायकवाड आणि पार्टी, संतोष, मालन जाधव आणि बालगायक कलाकार लालेश जागरण पार्टी यांचा सामना झाला.खंडोबा फाटा आणि मंदिरच्या पूर्व बाजूला पार्कींगची सुविधा केली होती.खंडोबा फाटा ते मंदिर हा १ किमी रस्ता वाहतुकीस दोन्हीही बाजूने बंद ठेवला होता. चंपाषष्ठीला पारनेर पोलीस, अहमदनगर पोलीस मित्र संस्था यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. जय मल्हार विद्यालयाचे विद्यार्थी तसेच अळकुटी महाविद्यालयाचे विद्यार्थी, क्रांती शुगर कारखाना सुरक्षा पथक यांनी स्वयंसेवक म्हणून सेवा चांगली सेवा दिली.कोरठण देवस्थानकडुन पिण्याचे पाणी, दर्शन व्यवस्था,इत्यादी बाबींचे चोख नियोजन करण्यात आले होते. या महोत्सवात उपस्थित राहून भाविकांनी  कुलदैवत स्वयंभू श्री खंडोबा, चंपाषष्ठी महाप्रसाद आणि श्री खंडोबा म्हाळसा घोड्यावरील भव्य पितळी मूर्ती मंदिर, ब्रम्हलीन प. पु. स्वामी गगनगिरी महाराज मूर्ती ध्यान मंदिर, शाहीरथ पालखी सोहळा यांचे दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. पांडुरंग गायकवाड यांनी केले होते.यावेळी देवस्थानचे उपाध्यक्ष  गंगाराम बेलेकर, सरचिटणीस  महेंद्र नरड, खजिनदार हनुमंत सुपेकर, चिटणीस  मनीषा जगदाळे, विश्वस्त अश्विनी थोरात, किसन मुंढे, बन्सी ढोमे, अमर गुंजाळ, देवीदास क्षीरसागर, सर्व माजी विश्वस्त, ग्रामस्थ व मुंबईकर मंडळी हजर होती.

यावेळी प्रतिक्रिया देताना देवस्थानचे अध्यक्ष अॅड.पांडुरंग गायकवाड म्हणाले,राज्यस्तरीय ब वर्ग तिर्थक्षेत्र श्रीकोरठण खंडोबा देवस्थानला दोन वर्षांनी हा महोत्सव भरला असुन,यावेळी भाविकांची उपस्थिती मागच्या पेक्षा कमी असली तरी, भाविकांच्या चेहर्‍यावर एक वेगळा उत्साह पहावयास मिळाला.कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करुन भाविकांनी कुलदैवत खंडोबाचा तळीभंडार करत मनोभावे दर्शन घेतले.पहाटे पासुन विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. किर्तन,भजन,खंडोबा गाणी, चांदीच्या उत्सव मूर्तींची रथयात्रा यामुळे कोरठण खंडोबा गडाचा परीसर आज दुमदुमुन गेला होता." सदा आनंदाचा एळकोट " चा गजर ऐकुन सर्व परीसर आनंदुन गेला.कुलधर्म, कुलाचार झाल्यामुळे दोन वर्षाने का होईना देवभेट घडुन आली.यासाठी सहकार्य करणार्‍या सर्व स्वयंसेवी संस्था,प्रशासन, सुरक्षा व्यवस्था,देवस्थान विश्वस्थ,प्रसार माध्यमे सर्वांनीच चांगले सहकार्य केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी बोलताना दानशुर दाते नानजीभाई ठक्कर यांनी देवस्थानचे अध्यक्ष गायकवाड व विश्वस्थांना धन्यवाद दिले.कोरठण खंडोबाच्या कृपेमुळे वीस वर्षामधे खुपच प्रगती झाली आहे. हजारो, लाखोंच्या संखेने भाविक येतात.कोरठण खंडोबाकडे आल्यावर निर्व्यसनी भारत बनावा असा संकल्प करावा असे आवाहनही केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या