Breaking News

विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर शहर पोलिसांची कारवाई


बारामती : 

बारामतीत विनामास्क फिरणार्‍या नागरिकांवर  आता पुन्हा एकदा शहर पोलिसांनी धडक कारवाई ला सुरुवात केली आहे. (दि :३०) रोजी इंदापूर चौकामध्ये शहर पोलिसांनी चार ते सहा वाजेपर्यंत नाकाबंदी सुरू केली होती. या दरम्यान विनामास्क फिरणाऱ्या वीस नागरिकांवर शहर पोलिसांनी कारवाई केलेली आहे.

सध्या आफ्रिकेतील ओमिक्रोन कोरोना व्हायरस आफ्रिकेमध्ये झपाट्याने पसरत आहे. त्याबाबत महाराष्ट्र शासनाने नवीन गाइडलाइन्स सुरू केलेले आहेत. या गाईडन्स मध्ये सर्वांनी सोशल डिस्टंसिंग चे पालन करणे, मास्क वापरणे  बंधनकारक असणार आहे. लोकडाऊन मध्ये शिथिलता आल्यानंतर मास्क कारवाई पोलिसांनी कमी केली होती. परंतु शासनाच्या नवीन गाईडलाईन  आल्याने. बारामती शहर पोलीस ठाणे तर्फे विना मास्क फिरणार यासाठी विशेष मोहीम व नाकाबंदी पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे. 

घराबाहेर पडताना बाजारात फिरताना, कार्यक्रमाला जाताना तोंडावर मास्क असणे अनिवार्य आहे. आपण जर विना मास्क घराबाहेर, रोडवर, दुकानात, मोटरसायकलवर कारमध्ये दिसून आल्यास जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये पाचशे रुपये दंडाची पावती करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सांगितले.

No comments