शरद पवार यांचे भिंतीवर रेखाटलेल्या चित्राचे अनावरण


आळंदी : 


राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या ८१व्या वाढदिवसानिमित्त आळंदीकरांनी एक खास भेट दिली आहे.आळंदीतील दत्त मंदीर परिसरातील एका इमारतीवर शरद पवार यांचे २५ बाय ४० फूट आकाराचे भिंती चित्र रेखाटण्यात आले आहे. आळंदीतील चित्रकार अक्षय भोसले यांनी अवघ्या दहा दिवसांत हे चित्र पूर्ण केलं आहे.
शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच नगरसेवक प्रकाश कु-हाडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या चित्राचे अनावरण आमदार दिलीप मोहीते यांच्या हस्ते करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि नगरसेवक प्रकाश कु-हाडे यांच्या पुढाकारातून ही कलाकृती साकारण्यात आली आहे.यावेळी सभापती अरुण चौधरी,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर,माजी नगराध्यक्ष बबनराव कु-हाडे,नगरसेवक संतोष भेगडे,माजी उपनगराध्यक्ष अशोक रंधवे,नंदकुमार कु-हाडे,माजी नगरसेवक डि.डि.भोसले,अशोक उमरगेकर,ज्ञानेश्वर रायकर,पुष्पाताई कु-हाडे,नितीन घुंडरे,अजित वडगावकर,सागर कु-हाडे,दिपक पाटील,मनोज कु-हाडे,जिवनलाल चव्हाण,प्रसाद बोराटे,सतिशबापू कु-हाडे आदी उपस्थितीत होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या