सिद्धेश्वर मंदिराचे प्रमुख महंत १००८ बालब्रम्हचारी महाराज पंचतत्वात विलीन...

 

संत महंतांच्या उपस्थितीत शनिवारी साश्रू नयनांनी बाल ब्रम्हचारी महाराजांना भाविकांनी दिला निरोप

                    नेवासा : नेवासा तालुक्यातील टोका येथील श्री सिद्धेश्वर मंदिराचे प्रमुख महंत १००८ बालब्रम्हचारी महाराज यांचे शुक्रवारी (दि.१० डिसेंबर) रात्री १०.२१ वाजता वयाच्या ९९ व्या वर्षी देहावसान झाले. त्यांच्या अकस्मात निधनाने भक्त परिवारात मोठी शोककळा पसरली आहे. शनिवारी दि.११ रोजी संत महंतांसह हजारो भाविकांच्या उपस्थितीत अश्रू नयनांनी त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.

समाधिस्त होण्यापूर्वी सकाळी ११ वाजता महंत बालब्रह्मचारी महाराज यांना पुष्पांनी सजविलेल्या पालखीत बसविण्यात आले मंदिराला गोल प्रदक्षिणा झाल्यावर त्यांना स्मृती स्थळ स्थानावर आणण्यात आले.


यावेळी निघालेल्या शोभायात्रेमध्ये देवगडचे महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज, श्रीराम साधना आश्रमाचे प्रमुख महंत सुनील गिरी महाराज, ब्रह्मचारी महंत ऋषीनाथजी महाराज यांच्यासह देशातून आलेले संत महंत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी निघालेल्या शोभायात्रेमध्ये अग्रभागी सजविले अश्व,भगवे ध्वज हाती घेऊन महंत १००८ बाल ब्रह्मचारी महाराज की जय असा जयघोष करणारे भाविक डोक्यावर तुळशी कळस घेतलेल्या महिला भगिनी भजने गाणारे भजनी मंडळे सहभागी झाले होते.

सिध्देश्वर मंदिराच्या बाहेरील असलेल्या प्रांगणात संत महंतांच्या उपस्थितीत समाधी सोहळा पार पडला.

बालब्रह्मचारी महाराज हे सन १९७६ साली टोका येथे आले होते त्यावेळेस पुरातन महिमा व हेमाडपंथी शिल्पकलेचा आविष्कार असलेले सिद्धेश्वर मंदिर हे दुर्लक्षित होते तसेच मंदिर परिसराला काटवनाने वेढले होते.त्यावेळेस महंत बालब्रह्मचारी महाराजांनी येथे

मोजक्या भक्तांना एकत्रित करून या मंदिर परिसराची साफसफाई करून गोदावरीतीरावर स्वर्ग निर्माण केला होता.

जादूची कांडी फिरावी आणि चमत्कार व्हावा असा परिसर त्यांनी सुशोभित केला. हळू हळू भक्त परीवार त्यांनी जमविला त्यानंतर वेदमंत्राचा जयघोष येथे निनादु लागला.बाबांचा भक्त परीवार हा आपल्या देशासह जगात विखुरलेला असल्याने त्यांच्या संपर्कातून येथे त्यांनी श्रावणी सोमवार उत्सव,महाशिवरात्रीचा यात्रा उत्सव सुरू केला होता.

आज त्यांच्या इच्छेनुसार गोदावरी प्रवरा नदीच्या संगमावर बांधण्यात आलेल्या त्यांच्या स्मारकावर हिंदू धर्माच्या वैदिक पद्धतीने त्यांच्यावर वेदमंत्राच्या जयघोषात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाची वार्ता वाऱ्याप्रमाणे पसरली अनेकांनी सिध्देश्वर मंदिर प्रांगणात येऊन त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले दर्शन घेण्यासाठी पहाटेपासून भाविकांची रीघ लागली होती. मृद व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख यांनी शोक व्यक्त करीत बाबाजींच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.

यावेळी झालेल्या दुपारी १२वाजता झालेल्या समाधी सोहळयाच्या प्रसंगी प्रांगणात सोहळा सर्वांना पहाता यावा म्हणून स्क्रीन पडद्याची व्यवस्था करण्यात आली होती.समाधी स्थानावर आसन पूजा करण्यात आली यावेळी वेदमंत्राच्या जयघोषात समाधी सोहळा पार पडला यावेळी श्री क्षेत्र देवगड गुरुदेव दत्त पिठाचे महंत गुरुवर्य भास्करगिरी बाबा,महंत सुनीलगिरी महाराज गोपालानंदगिरी महाराज,बाबांचे बंधू जम्मू चे खासदार जुगलकिशोर शर्मा,नंदकिशोर शर्मा,युवा नेते उदयनदादा गडाख,माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे,भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस नितीन दिनकर,संतोष माने,वसंत डावखर,यांनी श्रद्धांजली अर्पित केली यावेळी भाविक डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.साश्रू नयनांनी यावेळी महंत बालब्रह्मचारी महाराजांना निरोप देण्यात आला.


(

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या