रिंगण वक्तृत्व स्पर्धेत संत विचारांचा जागर रंगला !


आळंदी : 


संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी सोहळ्याला ७२५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त तसेच रिंगणाच्या संत सेवेला १०व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती यांच्या विशेष सहकार्याने वार्षिक रिंगण आयोजित तरुणांमध्ये संत विचारांचा जागर करण्यासाठी रिंगण वक्तृत्व स्पर्धा २०२१ संत विचारांवर आधारित पहिली आणि एकमेव राज्य स्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रसाद देविदास जगताप,द्वितीय क्रमांक दत्तात्रय नाथ्याबा चोरमले,तृतीय क्रमांक अक्षय मारुती इळके, चतुर्थ क्रमांक रोहन जोतिराम कवडे,पंचम क्रमांक श्रिया मनोहर टेंग्से यांनी पटकवला असुन उत्तेजनार्थ पारितोषिक आकाश उद्धवराव सोनवणे,मंदार गोविंद लटपटे, प्रतीक्षा विठ्ठलराव गुरनुले, वृषभ सुशील चौधरी, मधुरा संदिप लिमये, सुयोग बारकू हांडे, अथर्व अंकुश जाधव यांना मिळाले आहे.विजेत्यांना आकर्षक करंडक, रोख रक्कम, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.वक्तृत्व स्पर्धाचा पारितोषिक वितरण सोहळा राजाभाऊ चोपदार,पुरुषोत्तम महाराज पाटील,विजय बिलेकर,स्पर्धेचे परीक्षक पांडुरंग कंद,शामसुंदर सोन्नर आणि रिंगणचे संपादक सचिन परब यांच्या हस्ते पार पडले. 
आजच्या तरुण पिढीला सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त करण्याची संधी मिळत असली तरी एखाद्या विषयावर थेट बोलण्याची संधी तशी कमीच मिळते.या तरुण पिढीमधून उत्तम वक्ते घडावेत, त्यांना संत साहित्यावर आपले विचार मांडण्याचे व्यासपीठ मिळावे यासाठी रिंगण वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती असे रिंगणचे सचिन परब यांनी सांगितले आहे.
स्पर्धेच्या संयोजनासाठी स्वामीराज भिसे, प्रविण शिंदे आणि सहकारी यांनी मेहनत घेतली. निवेदन स्पर्धा समन्वयक अश्विनी टाव्हरे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या