लोणीत बचत गटांच्या स्वयंसिध्दा यात्रेस प्रारंभ,

आ.राधाकृष्ण विखेंनी घेतला खाद्य पदार्थाचा आस्वादलोणी :

राहाता तालुकास्तरीय सक्षम महीला महोत्सव अर्थात स्वयांसंद्धा यात्रा २०२१ चे प्रारंभ माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. येथील खाद्य महोत्सवातील प्रत्येक स्टॉलवर माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट देत विविध खाद्य पदार्थाचा आस्वाद घेतांनाच प्रवरा  परिवार आपल्या सोबत आहे हा संदेश यानिमित्ताने त्यांनी महीला बचत गटांना  दिल्या.

     लोणी येथे जनसेवा फौंडेशन लोणी, पंचायत समिती राहाता ,कृषि विज्ञान केंद्र बाभळेश्वर, कृषि विभाग आणि आत्मा,अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने लोणीच्या प्रवरा मेडीकल ट्रस्टच्या पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रिडा संकुल येथे रवीवार पासून राहाता तालुकास्तरीय सक्षम महीला महोत्सव २०२१ हा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महीला स्वयंसहाय्यता गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन-विक्री आणि खाद्य महोत्सवांचा प्रारंभ माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालीनी विखे, रणरागिणी महीला मंडळच्या अध्यक्षा धनश्री विखे, भाजपा युवामार्चाचे सरचिटणीस सचिन शिदे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे सोमनाथ जगताप, राहाता पंचायत समितीच्या सभापती सौ. नंदाताई तांबे, जिल्हा परिषदेच्या सदस्या कविता लहारे, जिल्हा परिषद सदस्य दिनेश बर्डे, माजी उपसभापती बाबासाहेब म्हस्के, पंचायत समितीच्या सदस्य अर्चना आहेर, संतोष ब्राम्हणे, लोणीबुद्रुकच्या सरपंच कल्पना मैड, माजी सरपंच लक्ष्मण बनसोडे, माजी उपसरपंच अनिल विखे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, तालुका कृषि अधिकारी डॉ. बापुसाहेब शिंदे, जनसेवा फौंडेशनचे मुख्यकार्यकारी  अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर, प्रकल्प संचालिका रूपाली लोंढे आदीसह बचत गटांच्या महीला उपस्थित होत्या.
      आपल्या मार्गदर्शनात शालीनी विखे म्हणाल्या की, बचत गटातून व्यवसाय उभारणी व्हावी. लोकल टु लोकल ही संकल्पना घेऊ काम करतांना देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे  आत्मनिर्भर भारत हे स्वप्न पूर्ण    करण्याचे काम बचतगटाव्दारे होतं आहे.  बचत गटांतून बचत हा हेतू न ठेवता महीलांच्या हाताला काम आणि त्याच्यातील कलागुणांना योग्य संधी ही स्वयंसिद्धाच्या माध्यमातून मिळत आहे. आज बचत गटांची उत्पादने जागतिक पातळीवर पोहचत आहे यांचा मोठा आनंद आहे. तुम्ही पुढे या आम्ही आपल्या सोबत आहे असेही सांगितले.
          यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  संभाजी लांगोरे यांनी बचत गटाच्या उपक्रमाचा विशेष गौरव केला.  जीवनोन्नती अभियानाचे सोमनाथ जगताप यांनी राहाता तालुक्यातील बचत गटांचे कार्य दिशादर्शक आहे. जनसेवा फौंडेशन मुळे या गटांनी मोठी प्रगती केली आहे असे सांगितले. तर  धनश्रीताई विखे पाटील यांनी महीलांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहत असतांना स्पर्धा करा आणि स्पर्धेतून आपली ओळख निर्माण करा हा संदेश दिला.
     प्रारंभी गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनी प्रास्ताविकांत बचत गटांचा आढावा घेतना विविध उत्पादने, पोषण आहारांसाठी परसबाग या माध्यमातून आत्मानर्भर भारत हा संदेश गटाद्वारे दिला जात असून स्वयंसिध्दा २०२१ मध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहान केले. कार्यक्रमाचे आभार डॉ. संभाजी नालकर यांनी मानले.सोमवार दि.२६ डिसेंबर पर्यत ही स्वयंसिध्दा याञा सर्वानासाठी खुली असणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या