आत्मा मालिक हॉस्पिटल बनले गरजु रुग्णांचे संरक्षण कवच : ज्ञानेश्वर महाराज डोणगावकर


कोपरगाव तालुका प्रतिनिधी -
 

परमेश्वर याप्रमाणेच एखाद्याला जीवदान देण्याची ताकद डॉक्टरांमध्ये आहेत. आधुनिक वैद्यक शास्ञाने केलेली प्रगती ही धक्क करणारी आहे. आत्मा मालिक  हॉस्पिटल हे ग्रामीण भागात असले तरी मोठ्या महानगरपेक्षाही अधिक चांगल्या सुविधा देणारे अद्ययावत  हॉस्पिटल ओळखले जाते. गोर गरिबांसाठी संरक्षणाचे कवच असुन हेच आत्मा मालिक   हॉस्पिटल योग्य असल्याचे प्रतिपादन वारकरी, संत सुरक्षा विभागाचे राज्यप्रमुख ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज डोणगांवकर यांनी केले. 

कोपरगाव येथील आत्मा मालिक  हॉस्पिटल आणि साईबाबा मेडिकल हब व छञपती शिवाजी महाराज सेना हिंदुस्थान यांच्या संयुक्त विद्यामाने गंगापुर तालुक्यातील जि.प. शाळा बाभुळगांव नांगरे येथे मोतीबिंदु निदान व शस्त्रक्रिया शिबीर हॉस्पिटल चेअरमन सुमन जी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले त्या शिबीराचे उदघाटन प्रसंगी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज डोणगावकर बोलत होते.

यावेळी अंध अंपंग व रुग्ण कल्याण विभाग  राज्यप्रमुख ज्ञानेश्वर थोरात, हरीभाऊ महाराज पठाडे, ह.भ.प.अशोक महाराज सोनवणे आदि मान्यवर उपस्थितीत होते. याप्रसंगी आत्मा मालिक  हॉस्पिटलचे चेअरमन सुमन जी यांनी  हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेली सुविधांची माहिती देतांना सांगितले की, महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत येणारे सर्व उपचार मोफत दिले जात असुन अनेक रुग्णांनी लाभ घेतला आहे. ऑन्जिओप्लास्टी, बायपास, वाल्स रिप्लेसमेंट, मोडलेले हाडे, मणक्यांचे आजार, अस्थिरोग, कमी वजनाचे बाळ, अकाली जन्माला आलेले बाळ, जन्मजात कावीळ काढणे, लहान मुलांचे वेन्टीलेटर, अत्यावस्त बालरुग्ण, सर्जरी बाबत छातीचा कॅन्सर, तोंडाचा  कॅन्सर, जठार व अन्न नलिकेचे  कॅन्सर, पित्ताशय व आतड्याचा  कॅन्सर, मुञपिंड सह इतर आजार, फाटलेली आताडे व चिकटलेली आताडी, प्लास्टिक सर्जरी, मोतीबिंदु शस्त्रक्रियासाठी २० ते २५ हजार पर्यंत खर्च येतो परंतु ही शस्त्रक्रिया आत्मा मालिक  हॉस्पिटलमध्ये अल्पदरात होत असल्याने अनेक रुग्णांनी लाभ घेतला आहे आजही अनेक रुग्ण लाभ घेत आहेत. हॉस्पिटल मध्ये उपलब्ध असलेल्या योजनांचा रुग्णांनी घ्यावा असे आवाहान  हॉस्पिटलचे चेअरमन सुमन जी यांनी केले.   

गंगापुर तालुक्यात आयोजित केलेल्या शिबीराचा १०० पेक्षा जास्त रुग्णांनी लाभ घेतला असुन ३५ रुग्णांना मोतीबिंदु असल्याचे निष्पन्न झाले असुन यांच्यावर लवकरात लवकर उपचार सुरु होणार आहे, अशी माहिती होस्पिटलचे चेअर मन सुमन जी यानी दिली. हॉस्पिटलचे तज्ञ डॉ.  मेहेरबान सिंग यांनी रुग्णांची तपासणी केली.  निर्मला तुपे, नुरमोहमद सय्यद, वैशाली कापसे, अमोल गायकवाड यांच्यासह आदि हॉस्पिटलचे वैद्यकीय विभागातील कर्मचारी उपस्थित होते. शिबीराला तालुक्यातील व जवळपासच्या पंचक्रोशीतील नागरिकांनी शिबीराला चांगला प्रतिसाद दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या