देवगड येथे दत्तजयंती निमित्ताने दत्त याग व नाम यज्ञ सोहळयास उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ


नेवासा :
तालुक्यातील श्री देवगड येथे दि.१२ डिसेंबर ते १९ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या

श्री दत्तजयंती सोहळयाच्या निमित्ताने  श्री दत्त याग नाम यज्ञ सोहळयाला रविवारी दि.१२ डिसेंबर पासून गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या हस्ते  प्रारंभ करण्यात आला.या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन नियम पाळून करण्यात येत आहे.
       श्री गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या  अधिपत्याखाली होणारे  धार्मिक कार्यक्रम हे  अत्यल्प भाविकांच्या उपस्थितीत होणार आहे. दि.१२ डिसेंबर पासून सुरु झालेल्या श्री दत्तजयंती उत्सवामध्ये पहाटे ४ ते ६ काकडा भजन श्रींची प्रात:आरती,सकाळी
७.३० ते ८.३० गीतापाठ विष्णू सहस्त्रनाम,सकाळी ९ ते ११ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण,सकाळी ११ ते १ भोजन,
दुपारी ३ ते ५ ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ५ ते ७ हरिपाठ व श्रींची सायंम आरती,रात्री ७ ते ८ भोजन तर रात्री ८.३० ते १०.३० हरिकीर्तन कार्यक्रम होणार आहे
   दि.१८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता वेदमंत्राच्या जयघोषात मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत भगवान दत्तात्रयांचा जन्म सोहळा दत्त मंदिराच्या समोरील कीर्तन मंडपात पुष्पवृष्टी करून साजरा होणार आहे.याच दिवशी गुरुवर्य भास्करगिरी बाबांचे कीर्तन होईल तर दि.१९ डिसेंबर रोजी दत्तजयंती सोहळा सप्ताहाची सांगता गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या किर्तनाने होणार असून या कालावधीत भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री दत्त मंदिर संस्थान च्या वतीने करण्यात आले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या