Breaking News

ख्रिसमस सेलिब्रेशनच्या माध्यमातून सर्वधर्म समभाव


मांडवगण फराटा : 


२५ डिसेंबर हा प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्म दिवस हा दिवस ख्रिसमस डे किंवा नाताळ म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. २३ डिसेंबर रोजी शरदचंद्र पवार पब्लिक स्कूल मांडवगण फराटा शाळेत ख्रिसमस डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवाच्या माध्यमातून मूलांना धार्मिक विविधतेतून एकता या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.मूलांना प्रभू येशू ख्रिस्तांची शिकवण शांतता,संयम, शिस्त याविषयी मार्गदर्शन करत तसेच प्रेमाचा वर्षाव करा हा त्यांचा संदेश देण्यात आला.
मूलांनी सर्वधर्म समभाव व धर्मनिरपेक्षता या मूल्यांची जोपासना करणे हे आपल्या लोकशाही भारताची जबाबदारी व कर्तव्ये आहेत असे मत संस्थेचे अध्यक्ष राजीव फराटे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर वसंत फराटे पाटील, सचिव मृणाल फराटे पाटील संस्थेचे विश्वस्त धनश्री फराटे पाटील, क्याम्पस डायरेक्टर संग्राम धावडे, मुख्याध्यापक  संदीप कोकरे , तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments