रस्त्यावर आलेली काटेरी झुडपे ठरतायत धोकादायक ...


सोमेश्वरनगर 

- बारामती तालुक्याची सुरुवात होत असलेल्या निंबुत नजीक असलेल्या वड्यालगत निरा-बारामती महामार्गावर दुतर्फा काटेरी झुडपे वाढल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा रस्ता नेहमीच वर्दळीचा असल्याने दिवसभरात अनेक प्रवाशी ये जा करत असतात  नजीक निरा (ता पुरंदर) हे शहर  असल्याने तसेच सोमेश्वरनगर पअसून आठ किमी अंतर असल्याने अनेक करण्यासाठी मधील अनेक गावामधील नागरिक ,महिला नोकरी निमित्त  निरा येथे  जात असतात तर सोमेश्वरनगर हे शिक्षण संकुल  व सोमेश्वर कारखाना असल्याने निरा तसेच आसपासच्या गावमधून मोठ्या संख्येने विद्यार्थी याच रस्त्याने सोमेश्वरनगर येथे, शिक्षणासाठी व नोकरी साठी नागरिक येत असतात ,रस्त्यावर या काटेरी झुडपांच्या फांद्या आल्याने अनेक दुचाकी वाहनांना प्रवास करताना समोरचा अंदाज येत नाही , त्यामुळे अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागले आहे. ही काटेरी झुडपे वेळेत न काढल्यास येथे  अपघात  होऊ शकतात. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे , या रस्त्यावरून  ये-जा करणाऱ्या प्रवाशांकडून मत व्यक्त केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या