नरेंद्र मोदी परीक्षा पे चर्चा द्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधणारनवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी  11 वाजता ‘मन की बात’ मधून देशाला संबोधित केल. नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा हा 84 वा भाग होता. नरेंद्र मोदी यांनी यावेळी 2022 मध्ये विद्यार्थ्यांशी परीक्षा पे चर्चा या अंतर्गत संवाद साधणार असल्याचं जाहीर केल. विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांना त्यांनी नोंदणी करण्याचं आवाहन केलं आहे. 28 डिसेंबरपासून नोंदणी सुरु होणार असल्याचं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षीप्रमाणं विद्यार्थ्यांशी परीक्षेपूर्वी संवाद साधण्याचं नियोजन करत असल्याचं जाहीर केलं. परीक्षा पे चर्चा कार्यक्रमासाठी 28 डिसेंबरपासून नोंदणीला सुरुवात करत आहोत. 28 डिसेंबरपासून mygov.in या वेबसाईटवर होईल. ही प्रक्रिया 28 डिसेंबर 20 जानेवारीपर्यंत सुरु राहील. यासाठी 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थी, पालक आणि शिक्षक नोंदणी करु शकतात. पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी ऑनलाईन स्पर्धांचं आयोजन करण्यात येणार आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या