हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने

तरूणांचे चेहऱ्यावर आले हसु !


पारगाव शिंगवे

मंचर पोलीस स्टेशन हद्दीत जानेवारी 2021 पासुन हरविलेले/गहाळ झालेले मोबाईलचा शोध घेण्याचे अनुशंगाने  अभिनव देशमुख, पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण यांनी सुचना देवुन हरविलेले सर्व मोबाईलचे आयएमईआय नंबर हस्तगत करून ते तत्काळ सायबर पोलीस स्टेशन येथे शोध घेणेकामी पाठविणेबाबत आदेश दिले. त्या अनुशंगाने  4 मोबाईलचा शोध लागला असुन त्या मोबाईलचे मालक अक्षय भुतांबरे रा. मंचर, संचिता टेमकर रा. अवसरी, अवधुत पडवळ रा. म्हाळुंगे पडवळ, प्रफुल्ल बेलवरे रा. वाफगांव ता. खेड जि. पुणे. यांचे चेहऱ्यावर एक प्रकारचे आनंदाश्रु तरारले.  

आपला गहाळ झालेला मोबाईल पाहुन त्यांनी एक प्रकारचे समाधान व्यक्त केले. पोलीसांचे कामाचे कौतुक करून अभिनंदन केले. तसेच यापुढे आणखी मोबाईलचा शोध लागल्यास त्या मालकांना बोलावुन त्यांना ते परत करण्यात येणार आहेत. त्यानंतर पोलीस निरीक्षक सतीष होडगर यांनी सर्व नागरीकांना आव्हाहन केले की, यापुढे कोणत्याही प्रकाराचा मोबाईल सापडलेस तो तत्काळ पोलीस स्टेशन येथे अथवा संबधीत मालकाकडे सुर्पत करावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या