बारामती सहकारी बँकेवर डॉ.सौरभ मुथा बिनविरोध.!

बारामती (दि:९)

बारामतीतील नामांकित डॉक्टर राजेंद्र मुथा यांचे चिरंजीव डॉ.सौरभ राजेंद्र मुथा यांची बारामती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवड झाली आहे. डॉ. सौरभ मुथा हे पहिल्यांदाच बारामती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उभे राहिले होते आणि ते बिनविरोध निवडून आले आहे. त्यामुळे विविध स्तरातून त्यांचे कौतुक, तसेच सत्कार केला जात आहे.

बारामती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी (दि:८) रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीपुरस्कृत सहकार प्रगती पॅनलचे तेरा उमेदवार वगळता अन्य तीन अर्ज राहिले होते. त्यामुळे निवडणूक होणार असेच चित्र पाहायला मिळत होते. परंतु राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी संध्याकाळी उशीरापर्यंत प्रयत्न करत ही निवडणूक बिनविरोध करण्यात यश मिळवले आहे.

बारामती सहकारी बँकेची निवडणूक अखेर बिनविरोध झाली आहे. दुपारपर्यंत राष्ट्रवादीपुरस्कृत पॅनलचे तेरा उमेदवार वगळता तीन उमेदवारी अर्ज मागे राहिल्यामुळे बँकेची निवडणूक होणार असे चित्र होते. मात्र संध्याकाळी उशीरापर्यंत राष्ट्रवादीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला. 

डॉ. विजयकुमार भिसे यांनी आपले तीनही अर्ज मागे घेतले आहेत. संध्याकाळी उशीरा डॉ. विजयकुमार भिसे यांनी आपले अनुसूचित जाती-जमाती प्रवर्ग आणि खुल्या प्रवर्गातील दोन उमेदवारी अर्ज मागे घेतले. तर त्यांच्या कन्या प्रतीक्षा भिसे यांचा महिला प्रवर्गातून दाखल करण्यात आलेला अर्जही मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या