पिरॅमिड हॉस्पिटलला केंद्र सरकारचा पुरस्कार


दौंड : 

येथील पिरॅमिड हॉस्पिटलला केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या पुरस्कार दिल्ली येथील खास कार्यक्रमात प्रदान करण्यात आला आहे.

पिरॅमिड हॉस्पिटलचे प्रमुख डॉ, समीर कुलकर्णी यांनी केंदीय सचिव ज्योती कलश यांचे हस्ते स्वीकारला आहे. यावेळी केंद्रिय आरोग्य मंत्री मनसुख मंडवीय, आरोग्य राज्य मंत्री भारती पवार, भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवकर, सिने अभिनेत्री खासदार जया प्रदा , यांचेसह मान्यवर उपस्थित होते.

पिरॅमिड हॉस्पिटलने पाच वर्षात केंद्र सरकारच्या संचलित विविध आरोग्य हितावह योजना कार्यान्वित केल्या आहेत. दरम्यान या योजने अंतर्गत तीनहजार रुग्णावर यशस्वी उपचार केले आहे. एकंदरीत वैद्यकीय सेवे सहित सामाजिक बांधिलकी जपल्याने त्यांच्या कार्याची केंद्र सरकारने दखल घेतली आहे. पुरस्काराबाबत डॉ, कुलकर्णी म्हणाले, हा पुरस्कार स्वीकारला असला तरी यासाठी दौंडच्या जनतेचे योगदान आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या