ओळखपत्रांमुळे बिंग फुटले; रिचेकिंगच्या नावाखाली घोटाळापुणे: टीईटी परीक्षेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे. जीए सॉफ्टवेअर कंपनीचे डॉ. प्रीतीश देशमुख यांच्या चौकशीनंतर देशमुख यांचा हा घोटाळा उघड झाला आहे. कुंपनच शेत खात असल्याचं या घोटाळ्यामुळे उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

तुकाराम सुपे हे महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षण परीषदेचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे आहे. सुपे यांच्यावर युवाशाही आणि एमपीएससी समन्वय समिती आधीपासूनच नाराज होती. उत्तर सूची आणि प्रश्न सूचीत तफावत असल्याची तक्रार या दोन्ही संघटनेकडून करण्यात आली होती. मात्र, या प्रकरणाची चौकशी झाली नव्हती. तसेच शिक्षण परिषदेने या तक्रारीवर आपलं उत्तरही दिलं नव्हतं. त्यामुळे या विद्यार्थी संघटनांचा संशय अधिकच बळावला होता. त्यानंतर हा घोटाळा उघड झाल्याने सुपे यांचे काळे कारनामेही उघड झाले आहेत.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून महाटीईटी आणि शिष्यवृत्ती परीक्षांचं आयोजन केलं जातं. बीएड आणि डीएड झालेल्या विद्यार्थ्यांची शिक्षक पात्रता परीक्षा घेतली जाते. विद्यार्थी घडवणाऱ्या शिक्षकांच्या पात्रता परीक्षेची जबाबदारी असलेल्या तुकाराम सुपे यांनाच अटक झाल्यानं टीईटी परीक्षेसंदर्भात कुंपणानंच शेत खालल्याचा संशय निर्माण झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या