निधी विना रस्त्याची दुरवस्था


मांडवगण फराटा :


रांजणगाव सांडस (ता.शिरूर) येथील डायरेक्टर वस्ती ते खोकड माळ दरम्यानच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. दोन ते तीन फुटापर्यंत खोल खड्डे पडलेले असून कामठे वाडी, बाळुबाईचा मळा ,अडीच नंबर ,मस्के वस्ती या भागातील नागरिकांना हा रस्ता असूनही  अडचण नसूनही खोळंबा अशी अवस्था झालेली आहे. 

प्रजिमा 40 व राज्य मार्ग 118 या रस्त्यावर अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचा निधी नाही. त्यामुळे हा रस्ता नेहमी दुर्लक्षित राहत आहे. आलेगाव पागा परिसरातून या रस्त्यावरून अवजड मुरूम डंपरची वाहतुक होत आहे. त्यामुळे हा रस्ता ठिकठिकाणी खचलेला आहे.अवजड वाहतुकीमुळे या रस्त्याची पूर्णपणे वाट लागलेली आहे. या भागातील शेतकरी वर्गांनी ठिकाणी पाणी वाहून नेणाऱ्या चाऱ्या बुजून शेती केल्यामुळे शेतातील पाणीही या रस्त्यावरती येत असून या रस्त्याला वर्षभर पावसाळ्यात सारखे पाणी वाहत असते. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या भागातील विद्यार्थी नागरिक प्रवासी दूध गवळी यांना याच खाचखळग्यातून प्रवास करावा लागत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या