पारनेर नगरपंचायतसाठी शहर विकास आघाडी कडुन १७ अर्ज दाखल..



  भाजप, शहर विकास विकास आघाडीसोबत.

.( पारनेर तालुका प्रतिनिधी ) : - पारनेर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांमधुन उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली असुन,येत्या २१ डिसेंबर रोजी नगरपंचायतसाठी मतदान होणार आहे.नगरपंचायत निवडणुकीसाठी शहर विकास आघाडीने सर्वच्या सर्व १७ जागांवर सोमवार दि.६ डिसेंबर रोजी सकाळी ११:३० ला उमेदवारी अर्ज दाखल केले.उमेदवारी अर्ज दाखल करण्या साठी अजुन एक दिवस बाकी असताना पारनेर शहर विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांनी वरच्या वेशीजवळ असणार्‍या भैरवनाथ मंदीरामधे भैरवनाथांचे दर्शन घेत सर्व उमेदवार व कार्यकर्ते मुख्य बाजारपेठेतून रॅलीने नगर पंचायत कार्यालयात आले.रॅलीमध्ये,माजी उप नगराध्यक्ष दत्तात्रय कुलट,चंद्रकांत चेडे,अर्जुन भालेकर, रविंद्र पुजारी, अशोक चेडे, सुधाकर दरेकर,उदय शेरकर,शशीकला शेरकर, जीवन ठुबे,कल्पना शिंदे,अर्जुन व्यवहारे यांच्यासह सर्व उमेदवार तसेच भाजपा व शहर विकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.रॅलीने शक्तीप्रदर्शन करत शहर विकास आघाडी व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी  घोषणाबाजी करत परीसर दणाणुन सोडला. नगरपंचायत कार्यालयात पोहोचल्यावर ऑनलाईन अर्जांच्या प्रति निवडणुक निर्णय अधिकार्‍यांकडे सादर करण्यात आल्या. निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी सुधाकर भोसले, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा पारनेर नगर पंचायतच्या मुख्याधिकारी डॉ. सुनिता कुमावत यांनी सर्व उमेदवारांचे अर्ज स्विकारले.

नामनिर्देशनपत्र दाखल केल्यानंतर प्रतिक्रिया देताना शहर विकास आघाडीचे नेते व माजी उप नगराध्यक्ष चंद्रकांत चेडे व अर्जुन भालेकर म्हणाले.आम्ही दिलले उमेदवार हे सक्षम असुन, जनतेच्या मनातील उमेदवार आम्ही रणांगणात उतरविले आहेत.त्यामुळे आता निवडणुक पक्रिया सुरु झाल्या पासुन विविध राजकिय पक्षांची उमेदवार शोधताना मोठी दमछाक झाली असल्याचे सांगीतले.आमच्याकडे मात्र अगोदर पासून सक्षम उमेदवार असल्याचे सांगीतले. नामनिर्देशन पत्र दाखल करण्यापूर्वी आमच्या उमेदवारांना फोडण्याचाही प्रयत्नसुध्दा झालाय. त्यांना कुठे माहीती आमचा एकही उमेदवार शहर विकास आघाडी पासून दुरावणार नाही.कारण आम्ही सर्व मतदारांचा कौल घेतल्यानंतरच उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शहर विकास आघाडीविषयी शहरातील मतदारांच्या मनामधे आदराची भावना आहे.त्यामुळे आता नगरपंचायतीची सत्ता पारनेरचे सुज्ञ मतदार शहर विकास आघाडीच्याच ताब्यात देणार असल्याचे सांगितले.यावेळी सर्व उमेदवारांसह कार्यकर्ते हजर होते.

आज दि.६ डिसेंबरला पारनेर नगरपंटायत निवडणुकीसाठी निवडणुक निर्णय अधिकार्‍यांकडे एकुण ३८ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.याअगोदर २ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.आतापर्यंत नगरपंचायत निवडणुकीसाठी  ४० उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.


शहरविकास आघाडीचे उमेदवार खालीलप्रमाणे,


प्रभाग १ शितल सुनील म्हस्के

प्रभाग २ उषा अर्जुन व्यवहारे

प्रभाग ३ अजित बाळासाहेब देशमाने

प्रभाग ४ सागर उर्फ गणेश विठ्ठल वैद्य

प्रभाग ५ चंद्रकांत रघुनाथ चेडे

प्रभाग ६ आशा चंद्रकांत चेडे

प्रभाग ७ मालन बापू शिंदे

प्रभाग ८ भूषण उत्तम शेलार

प्रभाग ९ शरद मधुकर नगरे

प्रभाग १० सुरेखा अर्जुन भालेकर

प्रभाग ११ शितल सागर कुलट प्रभाग १२ सुनंदा दत्तात्रय शेरकर

प्रभाग १३ विशाल अर्जुन शिंदे

प्रभाग १४ डॉ. तेजस तुकाराम औटी

प्रभाग १५ सविता राजेंद्र ठुबे

प्रभाग १६ संतोष कारभारी भिसे

प्रभाग १७ शारदा शिवाजी मगर, ममता सुभाष औटी

उमेदवारी अर्ज दाखल करावयास जाताना शहरविकास आघाडीचे उमेदवार,नेते चंद्रकांत चेडे, अर्जुन भालेकर व भाजपा कार्यकर्ते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या