शहीद रावत यांना सैनिक संघटनेच्या वतीने श्रद्धांजली


बारामतीशहीद सिडीएस बिपीन रावत व त्यांच्या पत्नी आणि इतर शहीद अधिकारी यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाल्यामुळे बारामती येथील जय जवान आजी माजी सैनिक संघटना यांच्या वतीने  शहरातील भिगवण चौक येथील हुतात्मा स्तंभ येथे (रविवार 12 डिसेंम्बर)  श्रद्धांजली वाहण्यात आली.
 
या प्रसंगी  जय जवान आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष  हनुमंत निबाळकर ,आजी माजी सैनिक संघटना  फलटण अध्यक्ष ज्ञानदेव नाळे व माजी संघटना अध्यक्ष सोपानराव बर्गे व  राज्यातील इतर माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्तीत होते.

सिडीएस बिपीन रावत यांचे कार्य प्रत्येक सैनिकांसाठी प्रेरणादायी होते व प्रत्येक भारतीयांच्या मनात देशप्रेम म्हणजे काय हे रावत यांनी दाखविलयाचे अध्यक्ष हनुमंत 
नींबाळकर यांनी सांगितले. देशासाठी कोणताही आनंदाचा कार्यक्रम असेल किंवा श्रद्धांजलीचा कार्यक्रम असो किंवा माजी सैनिक यांचे शासन दरबारी विविध प्रश्न असो बारामती  जय जवान आजी माजी सैनिक संघटना राज्यात अग्रेसर असते. ही देशासाठी भूषणावह गोष्ट असल्याचे अनेक व्यक्त्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या