ज्ञानेश्वरी पारायणास धर्म ध्वजारोहणाने प्रारंभ


नेवासा  : 


शहरातील ग्रामस्थांच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयास  मारुती चौकातील हनुमान मंदिराच्या प्रांगणात सोमवारी दि.२० डिसेंबर पासून धर्म ध्वजारोहणाने उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. या पारायण सोहळयाच्या निमित्ताने मारुती चौकात रात्री ८ ते १०  कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहे.
     नेवासा खुर्द ग्रामस्थांच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व पारायण सोहळयाच्या निमित्ताने जागृत असलेल्या मारुतीरायांच्या मूर्तीस नगराध्यक्ष सतीशभाऊ पिंपळे यांच्या हस्ते वेदमंत्राच्या जयघोषात अभिषेक घालण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे पौरोहित्य वेदशास्त्रसंपन्न आचार्य निखिलगुरू जोशी यांनी केले.
       हनुमान भजनी मंडळ व नेवासा खुर्द ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पारायण सोहळयाचा शुभारंभ मंडपाच्या अग्रभागी उभारण्यात आलेल्या धर्म ध्वजाचे पूजन करुन करण्यात आला. हभप अंकुश महाराज जगताप, हभप लक्ष्मण महाराज नांगरे, हभप हरी महाराज भोगे, जेष्ठ मार्गदर्शक बाळासाहेब पाटील, नगराध्यक्ष सतीशराव पिंपळे, इंजिनियर नगरसेवक सुनीलराव वाघ,अभिजित मापारी डॉ.मुरलीधर कराळे व्यापारी राजेंद्र मुथा,मुळा कारखान्याचे संचालक शिवा जंगले यांच्या हस्ते धर्म ध्वजारोहण करण्यात आले.

    यावेळी पंचपदी गाण्यातआली, उपस्थित मान्यवरांचे स्वागत सोहळा कमिटीचे सदस्य पत्रकार सुधीर चव्हाण यांनी केले व हा सोहळा गावचा असल्याने सर्वांनी या सोहळयासाठी योगदान द्यावे असे आवाहन केले. यावेळी झालेल्या शुभारंभ कार्यक्रमाला सुनीलराव वाघ,राजेंद्र मुथा, नगराध्यक्ष सतीशराव पिंपळे,मुरलीधर कराळे सरब यांनी या सोहळयासाठी गावकऱ्यांना बरोबर घेऊन योगदान देऊ अशी ग्वाही शुभेच्छापर मनोगतात बोलताना दिली.
   यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी पखवाज वादक भास्करराव तारडे,भजनी मंडळाच्या सदस्या कमल कराळे, आशाताई गायकवाड, सोहळा कमिटीचे सदस्य जेष्ठ मार्गदर्शक भाऊसाहेब माळवे,अशोकराव लोखंडे, भानुदास तोगे, विष्णूपंत औटी, ज्ञानेश्वर माऊली काळे, बाबासाहेब कोरेकर,भानुदास गटकळ,शक्ती भक्ती साऊंड सिस्टीमचे प्रमुख गोटूभाऊ तारडे, बबलू देशमाने,नारायण पोतदार, मोहिनीराज पोतदार,अनंतराव मापारी, शिवा राजगिरे यांच्यासह महिला व पुरुष वाचक भाविक उपस्थित होते
Attachments area

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या