मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएम मुंबईत धडकणार, उद्या मुंबईवर काढणार विराट मोर्चाऔरंगाबाद : राज्यात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच आता इतर आरक्षणावरूनही वातावरण तापलंय. मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापताना दिसून येत आहे. मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएम उद्या मुंबईत विराट मोर्चा काढणार आहे. या मोर्चाला औरंगाबादेतून सुरूवात होईल, आणि राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार आहेत. त्यामुळे मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण असे आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित असतानाच मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापलाय.

 औरंगाबादमधून सकाळी सात वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे. राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून मोर्चासाठी कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार आहेत. असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत मुंबईत विराट सभेचे आयोजनही करण्यात आले आहे. अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. या मोर्चाला मुंबई पोलिसांनी मात्र परवानगी नाकारली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या