शेरखान शेख यांना दर्पणरत्न पुरस्कार


तळेगाव ढमढेरे :

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार शेरखान शेख यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय गुणीजन गौरव महापरीषद कार्यक्रमात देणारा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार दर्पणरत्न पुरस्कार २०२१ प्रमुखांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
                          शिक्रापूर (ता. शिरूर) येथील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, सर्पमित्र शेरखान सिकंदर शेख यांनी अनेक सामाजिक कामे करत पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक प्रश्नांबाबत तसेच अन्याया विरुद्ध आवाज उठवित न्याय मिळवून दिला असून कोरोना काळामध्ये अनेक उल्लेखनीय कार्य केले आहे, त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय गुणीजन गौरव महापरीषद कार्यक्रमात देणारा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार दर्पणरत्न पुरस्कार २०२१ हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे. 
   यावेळी सुप्रसिध्द विचारवंत ह. भ. प. श्याममहाराज सोन्नर, साहित्यिक रमेश आव्हाड, बबनराव रसाळ, डॉ. शुभदा जोशी, प्रकाश सावंत, समाजसेविका मीनाक्षी गवळी, प्रवीण बामणे, शशिकांत सेलूकर, चंद्रहास गावंड, अमोल सुपेकर यांसह आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या