धर्मदाय रुग्णालय मुद्रांक व इतर सूट पाळतात का ? हे तपासावे : आ. कुल


दौंड   :
 धर्मदाय रुग्णालय मुद्रांक व इतर सूट दिल्यानंतर ती बंधने पाळतात का? हे तपासण्याची गरज असल्याचे मत दौंडचे आमदार राहुल कुल यांनी विधान सभेत बोलताना व्यक्त केले आहे.

विधान सभागृहात महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम सुधारणा या विधायक चर्चेवर सुधारणा सुचवतांना आमदार कुल बोलत होते.

 बंधन पत्र किंवा अन्य लेखा सदर्भामध्ये धर्मदाय दवाखाना, रुग्णालय, किंवा सार्वजनिक उपयुक्त तेचे इतर कोणतीही उद्दिष्ट्ये यासाठी वर्गणी दिली जाते. यामध्ये मुद्रांक सूट देण्याचा निर्णय यापूर्वीच शासनाने घेतला  आहे. परंतु धर्मदाय रुग्णालय समितीवर  गेल्या कित्येक दिवसा पासून काम करीत आहे. यामध्ये राज्यभर अतिशय निराशाजनक परिस्थिती दिसून येत आहे. वारंवार धर्मदाय समिती प्रमुख , विधी व न्याय मंत्र्यांच्या पासून सर्व समिती सदस्य चुकीच्या कामकाजाला आळा घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु रुग्णालये कोणतीही दाद देत नाहीत. 
त्यामुळे धर्मदाय रुग्णालयांना मुद्रांक सूट दिल्या नंतर संबधीत रुग्णालये त्याचे कामकाज करीत असताना त्यांना घालून दिलेली बंधने पाळून सवलती देत आहेत का, या संदर्भात राज्य शासनाने रुग्णालयांना सक्त सूचना करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणीच कुल यांनी केली.
याबाबत तपासून कार्यवाही करण्याची सूचना महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी दिल्या आहेत, असेही कुल यांनी नमूद केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या