ओवरलोडींग जड वाहतुकीमुळे नागरिकांचा जीव मुठीत


राहता (प्रतिनिधी ) 


शहरातून नगर मनमाड हा राज्य महामार्ग जात असल्याने या महामार्गावरून अनेक प्रकारचे लहान-मोठे वाहन जात असते त्याच बरोबर अवजड वाहने ही जात असते शिर्डी हे आंतरराष्ट्रीय ठिकाण असल्याने या महामार्गावरून जड वाहतुकीस बंदी असतानाही या महामार्गावरून सर्रासपणे जड वाहतूक होते. या मार्गाने नेहमीच ओवरलोडींगचा ट्रक भरधाव वेगाने शहरातून कोपरगाव च्या दिशेने जात होता हा ट्रक इतका मालाने भरलेला होता की  ट्रकची वरील बाजू डाव्या साईडला पूर्णपणे झुकलेली होती. 
ही काळीज चुकवणारी घटना होती, परंतु ड्रायव्हर कुठलीही काळजी न घेता गाडी वेगाने जात होता. ओव्हरलोड गाडीच्या बाजूने जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनचालकांचा जीव धोक्यात घातला. पायी चालणाऱ्या नागरिकांना या ओव्हरलोड ट्रकची भीती वाटत आहे. क्षमते पेक्षा जास्त प्रमाणात मालवाहतूक करत असल्याने अशी परिस्थिती निर्माण होत आहे.
महामार्ग पोलीस फक्त पावत्या फाडल्या साठीच आहे का ? या गाडीमुळे एखादा अपघात झाला असता तर त्याला  जबाबदार कोण ? असा नागरिक प्रश्न विचारत आहे.

गर्दीच्या ठिकाणी मोठा अपघात होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहे. जड वाहतुकीसाठी बायपास रोड तयार केला असून त्या रस्त्याने ही जड वाहतूक करण्यात यावी तसेच बायपास वर ही अनेक खड्डे पडून खराब असून तो लवकरात लवकर दुरुस्त करावा आणि जड वाहतूक बायपासने सुरू करवी अशी मागणी नागरिक करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या