विधानसभा उपसभापती मा.डॉ नीलमताई गोऱ्हे यांनी घेतले विघ्नहराचे दर्शन


ओतूर :


महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषद उपसभापती मा.डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी सोमवारी(दि.१३) विघ्नहर्त्याचे दर्शन घेतले.विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये शिवसेनीची सत्ता यावी तसेच या सरकारचे नेतुत्व आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवावे असा संकल्प त्यांनी केला होता.या संकल्पपूर्तीसाठी नीलमताई श्री विघ्नहराच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र ओझर येथे आल्या होत्या.त्यांनी विघ्नहराचे दर्शन करून अभिषेक व आरती केली.
नीलमताई गोऱ्हे यांचे स्वागत जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके,माजी आमदार शरद सोनवणे,श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे यांनी केले.नीलमताईंनी आपले मनोगत व्यक्त करताना ओझर प्रवेशद्वार ते मंदिर असा आठशे मिटरचा रस्ता कॉक्रेटी करण थोड्याच दिवसाच पूर्ण करण्याचा शब्द दिला तसेच अष्टविनायक विकास प्रकल्पांतर्गत मंजूर केलेल्या निधीची पूर्तता देखील करण्याचे मान्य केले.प्रवेशद्वार ते मंदिर या रस्त्याच्या कामासाठी त्यांच्या आमदार निधीतून रक्कम रुपये ११ लक्ष मदत जाहीर केली.देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्यांचा सत्कार देवस्थान ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष गणेश कवडे,खजिनदार कैलास घेगडे,विश्वस्त बी.व्ही.मांडे,विश्वस्त आनंदराव मांडे,मंगेश मांडे,गणपत कवडे,विजय घेगडे यांनी केला.या कार्यक्रमासाठी शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे,पंचायत समिती सभापती विशाल तांबे,तहसिलदार रवींद्र सबनीस,गट विकास अधिकारी माळी, मंडल अधिकारी काळे,कामगार तलाठी भोसले,ओझर गावच्या सरपंच मथुरा कवडे,ओझर नं २ च्या सरपंच तारामती कर्डक,उपसरपंच विठ्ठल जाधव, ग्रामपंचायत सदस्य राजश्री कवडे , तंटामुक्त समिती अध्यक्ष दत्तात्रय कवडे, ओतूर पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. अनिल केडूलकर,बीट अंमलदार महेश पठारे व ओझर गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार कैलास घेगडे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या