अवकाळी पावसामुळे लोणी मावळा परिसरात ६५ शेळ्या,मेंढ्यांचा मृत्यु.

  


पारनेर तालुक्यातील लोणीमावळा गावामधे काल दि.१ नोव्हेंबर रोजी रात्री झालेला अवकाळी पाऊस व थंडीमुळे तब्बल ६५ शेळ्या,मेंढ्या,कोकरांचा मृत्यु झाला आहे.लोणीमावळा येथील मापारी मळ्यामधे उपसरपंच गणेश मापारी यांच्या शेतामधे नन्हु पंगा बरकडे मुळचे मु.पो.चोंभूत, ता.पारनेर,यांच्या मेंढ्यांचा बसला होता. कालच्या अवकाळी पावसामुळे व कडाक्याच्या थंडीमुळे गावामधे हि दुर्घटना घडली.यामधे बरकडे यांच्या१४ मेंढ्या, १ शेळी,२ करडु,२ कोकरे अशा एकुण १९ जनावरांचा मृत्यु झाला आहे.तसेच काही जनावरे गंभीर जखमी आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.लोणी मावळामधे चासकरवाडी,  येथे बिरा मख्खा खरात यांच्या ५ मेंढ्या मृत पावल्या.कारखाना साईटवर गंगाराम नाना लव्हाटे मुळचे राहणार पळशी या मेंढपाळाच्या ५ मेंढ्या मत तर,२ कोकरं व ३ मेंढ्या गंभीर जखमी आहेत.मृतांचा आकडा वाढण्याची चिन्हे आहेत.यावेळी लोणीमावळाचे तलाठी डि.आर.मेहेत्रे यांनी पंचनामा केला आहे.यावेळी उपसरपंच गणेश मापारी व ग्रामस्थ हजर होते.

तालुक्यामधे अनेक ठिकाणी शेळ्या मेंढ्यांचा मृत्यु झाला आहे.यामधे रांधा येथे दरोडी रोडला रामा बयाजी घुले यांच्या१९ मेंढ्या,३ शेळ्या,२ कोकरे, ३ करडं अशा एकुण २७  शेळ्यामेंढ्या मृत तर, १४ जखमी आहेत.खंडोबा मंदिरजवळ मल्हारी नाथा घुले यांच्या ६ मेंढ्या मृत,२शेळ्या जखमी आहेत. तिसरी घटना रांधाफाट्यावर संतोष आनंदा घुले यांच्या ७ मेंढ्या मृत तसेच दत्ता गणपत ढेकळे यांच्या ४ मेंढ्या मृत,३ जखमी आहेत.अशी एकुण ४९  शेळ्या मेंढ्या दगावल्या आहेत.मंडल अधिकारी पी एस उचाळे यांनी येथे पंचनामा केला आहे.तसेच शिरापूरला तलाठी डि डि गोरे यांनी पंचनामा केला असुन,शिरापूरच्या नरसळवाडीमधे संतोष राजाराम बरकडे यांच्या २१ मेंढ्या,४ शेळ्या मृत असुन,२ मेंढ्या व १ शेळी गंभीर जखमी आहे.गांवठाण मधे सुनिल पुना कोकरे ७ मेंढ्या,१ शेळी १ मृत आहे.तसेच बयाजी दिना कोळेकर यांच्या ६ मेंढ्या मृत आहेत. यावळी शिरापूरचे सरपंच गुंडाभाऊ भोसले व ग्रामस्थ हजर होते.तसेच तालुक्यातील कीन्ही येथे ३९,ढवळपूरी मधे ६,सावरगांवमधे ९ मेंढ्या,पिंपरी पठारमधे १६,कळमकरवाडीमधे २१, टाकळी ढोकेश्वरमधे ११, वडझिरे मधे २ मेंढ्या व अनेक शेळ्या व मेंढ्या जखमी आहेत.पारनेर तालुक्यामधे विविध ठिकाणचा आकडा येणे बाकी आहे.मृतांच्या आकड्यामधे वाढ होण्याची शक्यता आहे.एकुणच पारनेरमधे अवकाळी पावसामुळे मृत्युचे तांडव सुरु झाले आहे.सरकारणे आम्हाला मदत करावी अशी मागणी करताना गरीब शेतकरी दिसताहेत. दरम्यान मेंढपाळ व तलाठी यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या