मुळा मुठा कालव्यास पाणी सोडावे


दौंड :

खडक वासला मुळा - मुठा कालवा हा  गेल्या दोन महिन्या पासून बंद आहे. दीर्घकाळ कालवा बंद राहिल्याने शेतपिकासह पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी कालव्यास त्वरित पाणी सोडण्याची मागणी गावोगावचे सरपंच आणि शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.
मुळा मुठा कालव्यावर हवेली दौंड आणि इंदापूर या तीन तालुक्याचे अंदाजे 68 हजार हेक्टर शेती अवलंबून आहे.
यासह या तीनही तालुक्यातील मोठी गावे आणि लहान लहान कित्येक गावाच्या  पिण्याच्या पाण्याच्या योजना या मुळा- मुठा  कालव्यावर अवलंबून आहेत. कालवा 15 दिवस बंद ठेवला तरी लहान लहान गावच्या पिण्याच्या पाणी योजना अडचणीत येतात.
हवेलीमधील फुरसुंगी, लोणीकळभोर, उरुळी कांचन दौंड मधील यवत केडगाव वरवंड पाटस दौंड या मोठ्या गावासह कित्येक लहान गावच्या पिण्याच्या पाणी योजना सध्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. दीड ते दोन महिने कालवा बंद असल्याने गहू, कांदा, हरभरा तरकरी पीक पाण्या अभावी सुकू लागली आहेत. पाटबंधारे खाते, कालवा पाणी नियोजन समिती यांनी याची दखल घेऊन त्वरित पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या