हरभरा पीक थंडीमुळे चांगले येणार


सोमेश्वरनगर  :


या वर्षी ऑक्टोबरपर्यंत पाऊस झाला. नोव्हेंबरमध्येही जेमतेम थंडी होती. आता डिसेंबरच्या शेवटच्या टप्प्यात थंडीने जोर चांगलाच धरला आहे. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात सह जिल ग्रामीण भागात  जोर वाढला आहे. यंदा हिवाळाही अधिक तीव्र स्वरुपाचा जात आहे. सध्या रात्रीचे किमान तापमान काही अंशांपर्यंत खाली आले आहे. तर दिवसाचेही कमी झालेले असल्याने दिवसभर बोचरी थंडी जाणवत राहतेबारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखाना कार्यक्षेत्रात असल्यामुळे सोमेश्वरनगर हे ऊस बागायत पट्टा म्हणून ओळखले जाते असे असून सुद्धा युवा पिढी तरकरी  पिकाकडे वळलेली दिसत आहे . चौधरवाडी , वाकी ,चोपडज, मगरवाडी ,
नाईकवाडी,देऊळवाडी, करंजे ,करंजेपुल या भागातील शेतकऱ्यांनी हरभरा ,
गहू,मका ,वाल ,टोमॅटो, भेंडी ,कोबी ,फ्लावर अशी वेगवेगळी तीनमाही  सहामाही पिके घेऊन शेतकरी आर्थिक दृष्ट्या सकल होण्याच्या प्रयत्नात आहे. असे असताना बारामतीतील  किरण हजारे (वाकी) यांनीजंबो  हरभरा पीक घेतले असून या हरभरा पिकांना थंडीचे दिवस पोषक मानले जातात.तरी गेले काही दिवसापासून हरबरा, गहू पिकांना थंडी आवश्यक असते त्याच प्रमाणे काही दिवसांपासून थंडीने चांगलाच जोर धरला आहे आडसाली ऊस सोमेश्वर कारखाना कार्यक्षेत्रात ऊस गाळपासाठी केल्यानंतर लगेचच शेतकरी मशागत करत हरभरा,गव्हाचे पीक करत असतो आत्ता गहू हरभरा या पिकाला एक ते दीड महिना झाला असून थंडीच्या जोरामुळे गहू हरभरा पीक चांगलेच जोमात येणार असल्याचे शेतकरी किरण हजारे यांनी बोलताना सांगितले. 

फोटो ओळ-किरण हजारे यांच्या शेतातील हरबरा पीक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या