निलेश ढावरे शरीर सौष्ठव स्पर्धेत प्रथम


इंदापूर :


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती अंतर्गत आयोजित हुतात्मा महाविद्यालय राजगुरुनगर येथे घेण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये इंदापूर येथील निलेश राहुल ढावरे याने ५५-६० किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला.

       निलेश ढावरे यांचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाची गुजराण करत आहेत. अतिशय खडतर परिस्थितीतून निलेश ढावरे यांचे शिक्षण चालू आहे. सध्या तो आय कॉलेज इंदापूर येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. सर्व स्तरातून त्याचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे. श्रीरामपूर येथे दि. २० डिसेंबर रोजी होणा-या विभागीय स्पर्धेसाठी ढावरे याची निवड झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या