आता रेशन दुकानांना मिळणार आयएसओ मानांकन

जेजुरी :- पुरंदर तालुक्यातील रेशन दुकानांना आयएसओ मानांकन मिळण्यासाठी दुकानात करावयाच्या उपाययोजना व मानांकनासाठी च्या सर्व सुचना देण्यात आल्या आहेत. पुणे पुरवठा विभागाचे उपायुक्त यांनी दिलेल्या सुचनेनुसार पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील रेशन दुकानांना आय.एस.ओ.मानांकन मिळवण्यासाठी तहसीलदारांना आदेश देण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने पुरंदर तालुक्यातील सर्व रेशन दुकानदारांची बैठक सासवड येथील संभाजी सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महसुल नायब तहसीलदार अतुल घाडगे यांनी दुकानदारांना योग्य ते मार्गदर्शन केले . यावेळी तालुका पुरवठा निरीक्षक सुधीर बडदे, पुरवठा अधिकारी नागपुरे मॅडम, महादेव वावरे, राधिका पवार आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित दुकानदारांना धान्य वितरण,परवाने नुतनीकरण,मयताचे नावे डिलीट करणे,डबल कार्ड डिलीट करणे, आधार नंबर सिंडीग करणे,आदि बाबत माहिती देण्यात आली. या बैठकीसाठी रेशन दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या