बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्याने आनंदोत्सव


आळंदी :

 महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाने गुरूवारी सशर्त परवानगी दिली.त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा बैलगाडा शर्यती सुरू होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या संघर्षाला यश आले आहे. शर्यतीसाठी काही अटी घालण्यात आल्या असून त्यानुसार शर्यती पार पाडव्या लागणार आहेत. न्यायालयाने घातलेली ही बंदी उठवावी आणि राज्यात बैलगाड्यांच्या शर्यती पुन्हा सुरू व्हाव्यात, यासाठी बैलगाडा मालक, संघटना आणि राज्य सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालायाच याचिका दाखल करण्यात आली होती.
बैलगाडी शर्यतीवरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठविल्यानंतर बैलगाडी शर्यत शौकीनांनी जल्लोष केला.श्री क्षेत्र आळंदी येथील अनेक चौकात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला आळंदी व पंचक्रोशीतील नागरिकांनी बैलगाडा शौकिनांनी साखर वाटून,भंडारा उधळून व बैलांना औक्षण करून आनंदोत्सव साजरा केला.
वर्षोनुवर्षे उरूस, यात्रामध्ये बैलगाडी शर्यती सुरू होत्या. या शर्यतीवर बंदी घातल्याने ग्रामीण संस्कृती नष्ट होते की काय अशी भीती व्यक्त केली जात होती. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवून बैलगाडी शर्यत शौकिनांना न्याय दिला आहे असे मत प्रसिद्ध बैलगाडा मालक आणि आळंदी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष आदित्य घुंडरे यांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या