नगरपंचायत एकदाच ताब्यात द्या!

शहराचा चेहरा मोहराच बदलतो : आ.निलेश लंके 

नगरपंचायतमधे राष्ट्रवादीचे जोरदार शक्तीप्रदर्शन..


( पारनेर तालुका प्रतिनिधी ) : 

 मंगळवार दि. ७ डिसेंबरला अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने  पारनेर नगरपंचायत मधे जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. ४ प्रभागांमधे स्थगीती आल्यामुळे  फक्त १२ प्रभागातच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. निवडणुक निर्णय अधिकारी तथा  प्रांताधिकारी सुधाकर भोसले व सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी डाॅ. सुनिता कुमावत यांनी सर्व उमेदवारांच्या उमेदवारी अर्जांचा स्विकार केला.पारनेर नगर पंचायत निवडणुकीसाठी आतापर्यंत एकुण ८९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.पैकी नागरीकांच्या मागास प्रवर्गातील १३ उमेदवारी अर्जांना सध्या स्थगीती देण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी १३ जागांसाठी एकुण ७६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी सांगीतले.

सविस्तर-

नगरपंचायत साठी एकुण १७ जागा असल्या तरी, स्थगीत झालेल्या प्रभागामधे दाखल अर्ज १३ आहेत. निवडणुक प्रस्तावित जागा १३ आहेत.निवडणुक स्थगीत जागा ४ आहेत.एकुण दाखल अर्ज ८९ आहेत.यामधुन १३ स्थगीत अर्ज वजा केल्यावर एकुण दाखल अर्ज ७६ होतात.

पारनेर नगर पंचायत निवडणुकी मधे तिरंगी सामना होईल असे चित्र निर्माण झाले आहे.तिरंगी सामना झाल्या वर निवडणुकीमधे काटेकी टक्कर पहावयास मिळणार आहे. यावेळी पारनेरचे आमदार निलेश लंके,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके,तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, अॅड्. राहुल झावरे,संजय मते, विजय औटी, विजय डोळ, संदिप चौधरी, सचिन पठारे, उमाताई बोरुडे, वैजयंता मते बाळासाहेब औटी, विजय तराळ आदींसह उमेदवार व कार्यकर्ते हजर होते.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर  प्रतिक्रिया देताना आमदार निलेश लंके म्हणाले,निलेश लंके,

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार,उपमुख्यमंत्री अजितदादा, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई,पालकमंंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शना खाली १७ प्रभागांमधे उमेदवार उभे केलेले आहेत.परंतु आज दुपारी ४ प्रभागांमधे स्थगीती आल्यामुळे आम्हाला अर्ज भरता आले नाहीत मात्र १३ प्रभागांमधे उमेदवारी अर्ज भरलेले आहेत. आम्हाला पारनेरकरांवर शंभर टक्खे खात्री आणि विश्वास आहे.त्यामुळे आम्ही १७ च्या १७ जागांवर राष्ट्रवादीचेच उमेदवार निवडुन येतील अशी आम्हाला खात्री आहे.पत्रकारांनी खासदार सुजय विखेंनी आपल्यावर जोराची टिका केल्याचा प्रश्न केल्यावर आमदार लंके म्हणाले, माझ्यावर टिका केल्यामुळे त्यांचा टिआरपी वाढतो.म्हणुन काहींचा फक्त धंदाच आहे फक्त निलेश लंकेवरती टिका करायची.त्यामुळे त्यांचे मार्केटिंग होतंय म्हणुन ते टिका करतात. त्याच्याकडे मी लक्ष देणार नाही.राज्य सरकारमधे काही घडामोडी झाल्या तर आमचे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. ज्यांचा सरकारशी काहीही संबंध नाही. त्यांचे ते वायफळ बोलणं असल्यामुळे त्यांच्या बोलण्याला महत्व देण्याची गरज वाटत नसल्याचे ते म्हणाले. नगरपंचायत हि आम्हाला आमच्या स्वार्थासाठी ताब्यात नको आहे. तर पारनेरच्या विकासासाठी ताब्यात घ्यायची आहे.पारनेर नगरपंचायत झाल्यापासुन डेव्हलपमेंट झाली नाही. पारनेर खेड्यासारखे आजही पहायला मिळते. विकासाचा कुठलाही आराखडा नाही.बचत गटांकडुन भाड्याने घेतलेल्या ईमारतीमधे पारनेरची नगर पंचायत आहे.पाणी प्रश्नावर बोलताना आमदार म्हणाले,१५ दिवसाला शहरात पाणी येते. शहरातील विविध प्रश्न सोडविण्यासाठीच नगरपंचायत आम्हाला ताब्यात घ्यायची आहे. विकास करायचा आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पिंपळनेरला आले तेथील कार्यक्रमामधे त्यांनी पारनेरचा पाणीप्रश्न सोडविण्याची घोषणा त्यांनी केली.तो प्रश्न सोडविण्या साठी आठ दिवसात डिपीआर केला.नागपूरवरुन टिम बोलावुन सर्वे केला.व ७२ कोटींची तरतूद केली.व ती पाण्याची मागणी मंजुर झाली आहे.नगर पंचायतची निवडणुक अजुन आठ दिवस पुढे असती तर या पाणीपुरवठा योजनेचा आम्ही नारळच फोडला असता.८ दिवसापूर्वी गावातील प्रश्नांवर ३ कोटी रु.ची मंजुरी मिळाली आहे.आमदार लंके फक्त बोलत नाही तर करुन दाखवतो. काहीजन बोलुन दाखवतात मी पारनेरला वेगळ्या उंचीवर घेवुन जाणार आहे आणि कर्तव्यशुन्य. अशातला मी नाही.कोव्हीडच्या काळात आम्ही कोट्यावधी रुपयांचा निधी तालुक्यात आणलाय.पारनेरचे शहरीकरण करण्यासाठी व पारनेरचा पाणी प्रश्न कायमचा सोडविण्या साठीच नगरपंचायत ताब्यात हवी आहे असे सांगीतले.हि नगरपंचायत मतदारांनी एकदाच ताब्यात द्यावी.पारनेर शहराचा चेहरा मोहराच बदलवण्याची जबाबदारी माझ्यासह माझ्या सहकार्‍यांची असेल असे वक्तव्य केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या