क्रिकेट म्हणजे खेळाची पंढरी : दिलीप यादव


वाल्हे प्रतिनिधी - 

 
सध्याच्या युगात क्रिकेट म्हणजे खेळाची पंढरी असल्याचे मत पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य व शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिलीप आबा यादव यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्राचे माजी जलसंपदा तथा जलसंधारण मंत्री विजयबापू शिवतारे यांच्या वाढदिवसानिमित्त राहुलदादा युवा मंच तसेच वाल्हे पंचक्रोशीतील शिवसेना व युवासेनेच्या संयुक्त विद्यमाने वाल्हे (ता. पुरंदर) येथील पालखी मैदानात भव्य हाफपिच क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी या सामन्यांचे उद्घाटन जि. प.सदस्य दिलीप आबा यादव तसेच शिवसेना नेते प्रकाशभाऊ ताटे यांच्या हस्ते करण्यात आले. या दरम्यान आयोजित कार्यक्रमात यादव हे बोलत होते.
याप्रसंगी नीरा कोळविहिरे गटाच्या जिल्हा परिषद सदस्या शालिनी पवार माजी सभापती अतुल मस्के गिरीश पवार रमेश जाधव युवा सेनेचे तालुकाप्रमुख मंदार गिरमे युवा नेते सागर मोकाशी वागदरवाडीच्या सरपंच उषा पवार आडाचीवाडीचे सरपंच दत्तात्रेय पवार उपसरपंच मंदाकिनी पवार तसेच सोनाली यादव अर्चना पवार प्रांजल भोसले सामाजिक कार्यकर्ते गोरख मेमाणे यांसह प्रदीप चव्हाण तन्मय पवार प्रशांत दाते ऋषिकेश कोंढाळकर सुशांत पवार उमेश गायकवाड महेश पवार राजकुमार यादव आदिंसह विविध संघाचे खेळाडू तसेच क्रिकेटचे चाहते मोठया संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेनेचे नीरा गण प्रमुख राहुल यादव यांनी केले तर उपस्थितांचे आभार सागर भुजबळ यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या