विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसला पडणार खिंडारनागपूर : विदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा काँग्रेसच्या वाटेवर आहेत. मंत्री धनंजय मुंढे यांचे निकटवर्तीय काँग्रेसच्या वाटेवर आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा मतदारसंघातील NCP चे अनेक पदाधिकारी पक्ष सोडणार आहेत. राष्ट्रवादीच्या जिल्हा नेतृत्वाने वेळोवेळी डावललं. त्यामुळं राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षावर उघड नाराजी व्यक्त केलीय.

पाच वर्षांपूर्वी वणी विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस अस्तित्वात नव्हती. तेव्हा धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून डॉ. महेंद्र लोढा यांच्यासह अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. धनंजय मुंडे यांनी वणी विधानसभा क्षेत्राची जबाबदारी लोढा यांच्याकडं सोपविली. तेव्हापासून मी राष्ट्रवादीसाठी काम करत असल्याचं डॉ. महेंद्र लोढा यांनी सांगितलं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या