दिव्यांगाचा आंतरजातीय सामुदायिक विवाह सोहळा संपन्न


आळंदी : माणसाने माणसाचा, करू नये कोंडमारा! ज्याला जड झाले ओझे, त्याचा उचलावा भारा!! या कवितेच्या ओळी प्रमाणे अनेक गरजूंना कायम जमेल त्या प्रकारची मदत करून त्यांना पायावर उभे करण्याचे काम गेली अनेक वर्ष राजू हिवरे यांच्या अध्यक्षतेखाली झुंज दिव्यांग संस्था ही करत आहे,या संस्थेच्या माध्यमातून दिव्यांगासाठी आंतरजातीय सामुदायिक विवाह सोहळा नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी पाच दिव्यांग जोडप्यांचा विवाह सोहळा पार पाडला. 


 या प्रसंगी नव वधू-वरांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी आमदार महेश लांडगे,भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषाताई उर्फ माई ढोरे या उपस्थित होत्या. याप्रसंगी झुंजु दिव्यांग संस्थेला मदत करणाऱ्या विविध संस्था तसेच व्यक्तींना यावेळी स्मृतिचिन्ह देऊन उपस्थितांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या विवाह सोहळ्यासाठी टाटा मोटर्स फाऊंड्री चिंचवड, निलेश नेवाळे सोशल फाउंडेशन, आधारस्तंभ दिव्यांग फाउंडेशन लोणावळा, सद्सेवा प्रतिष्ठान वारजे, शिवरुद्र प्रतिष्ठान फेडरेशन ऑफ घरकुल यांनी विशेष सहकार्य केले.

यावेळी झुंज दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष राजू हिवरे, महिलाध्यक्षा नुतन रोहमारे,कार्याध्यक्ष राजेश दिवटे, सहा.आयुक्त श्रीनिवास दागंट, उद्योगपती निलेश नेवाळे,कवी पुरुषोत्तम महाराज हिंगनकर, इंद्रायणी सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे, महेश अग्रवाल, राहुल येवले, गणेश बाफना,सचिन म्हसे, भारती पवार, तानाजी मराठे, जान्हवी बोत्रे तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या