अनधिकृत विज वापरणाऱ्यांवरती कडक कारवाई करणार : एस ‌.आर.पावडे


बारामती :


 शेती ग्राहकांसाठी माळेगाव हे महावितरणच्या वतीने संपूर्ण राज्यात रोल माॅडेल बनवायचे आहे असे प्रतिपादन महावितरणचे मुख्य अभियंता एस.आर.पावडे यांनी केले. दरम्यान संवाद मेळाव्यात सुमारे साडे दहा लाख रुपयांची वसुली करण्यात आली.
 
    विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्य विश्वास मांढरे यांनी विद्युत ग्राहक शेतकरी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्युत नियंत्रण समिती अध्यक्ष अॅड.रविंद्र माने, महावितरणचे कार्यकारी अभियंता जि.एम.लटपटे, उपअभियंता जि.व्ही.गावडे,माळे शाखा अभियंता आर.एस.राख व शेतकरी, ग्राहक, महावितरणचे कर्मचारी उपस्थित होते.
    
     यावेळी बोलताना महावितरणचे मुख्य अभियंता एस.आर.पावडे म्हणाले की, महावितरणच्या वतीने शेतकरी ग्राहकांच्या सर्व समस्या सोडविल्या जातील.सर्व्हिस कनेक्शन एका दिवसात दिले जाईल. पाणंद रस्त्यावरील पोलची उंची वाढवली जाईल.पाणी पुरवठा समितीच्या धर्तीवर शंभर टक्के वसुली असलेल्या शेतकरी वर्गाचा व्हाॅटस डि.पी. गृप तयार करून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
     दरम्यान कमी दाबाने विज मिळणे, नवीन कनेक्शन, विद्युत बिल कमी करणे, विद्युत तारांची उंची वाढविणे,डि.पी.च्या समस्या बाबत शेतकरी गामजी गोफणे, अशोक तावरे, प्रकाश शेटे,भारत खोमणे यांनी प्रश्न उपस्थित केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वास मांढरे, सुत्रसंचलन डॉ.राजेंद्र सस्ते तर आभार सचिन कुचेकर यांनी मानले.
  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या