सलमान खानला सापानं केला दंश मुंबई : अभिनेता सलमान खानला सापानं दंश केलाय. पनवेलच्या फार्महाऊस मधली ही घटना आहे. यानंतर त्याला रात्री 3 .30 वाजता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. MGM हॉस्पिटलमध्ये तो दाखल होता. दरम्यान आता त्याला घरी सोडण्यात आलंय.

ख्रिसमसनिमित्त सलमान खान त्याच्या कुटुंबीय आणि मित्रांसह पनवेल इथल्या फार्महाऊसला काल आला होता. मध्यरात्री बाहेर पडल्यानंतर हा प्रकार घडला. सुदैवाने साप बिनविषारी होता, त्यामुळे मोठं संकट टळलं. या प्रकारानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारानंतर सकाळी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. आता त्याची प्रकृती ठीक असल्याचं समजतंय.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या