चकोर यांच्या निधनानंतर चंद्रकांत पाटीलांची कुटुंबियांना भेट


मांडवगण फराटा :

 येथील भाजपचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, भारतीय कृषी अनुसंधान समितीचे सदस्य श्यामकांत चकोर यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. या निधनानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चकोर कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. या वेळी चंद्रकांत पाटील यांनी शामराव चकोर यांच्यासोबत असलेल्या  अनेक आठवणींना उजाळा दिला.
शिरूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या विस्तारात श्यामराव चकोर यांनी मोलाचे योगदान दिले असून तसेच पक्षात देखील त्यांनी सातत्याने चांगले काम दाखवून दिले. चंद्रकांत पाटील व चकोर यांचे वैयक्तिक संबंध अत्यंत घनिष्ठ होते. यामुळे चांगला सहकारी गमावला असल्याचे त्यांनी या वेळी बोलून दाखविले. या प्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे, नवनाथ चकोर, लक्ष्मण चकोर, संभाजी चकोर, काळुराम चकोर, दीपक जगताप, उमेश चकोर यांच्यासह चकोर कुटुंबीय उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या