झुंजच्यावतीने पत्रकार कुऱ्हाडेंचा गौरव


आळंदी : 


पुणे येथे अपंग बांधवांसाठी कार्य करणाऱ्या झुंज दिव्यांग संस्था महाराष्ट्र राज्य आयोजित अपंग बांधवांच्या आंतरजातीय सामुदायिक विवाह सोहळ्यात भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या हस्ते सामाजिक कार्याबद्दल, युवा पत्रकार दिनेश कुऱ्हाडे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 

यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर उषा उर्फ माई ढोरे,झुंज दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष राजू हिरवे,कार्याध्यक्ष राजेश दिवटे,कवी पुरुषोत्तम महाराज हिंगणकर,इंद्रायणी सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे उपस्थित होते.
दिनेश कु-हाडे हे एक आदर्श सामाजिक पत्रकार आहेत.गोरगरीब विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते सतत धावून जातात, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना नेहमीच न्याय देण्याचे आदर्श काम करत आहेत.  म्हणून त्यांना झुंज संस्थेच्यावतीने पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले म्हणून स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले आहे असे झुंजू संस्थेचे कार्याध्यक्ष राजेश दिवटे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या