ममतांचा दूत म्हणून काम करून शिवसेनेने महाराष्ट्र द्रोह केला; आशिष शेलार

 


मुंबईः शिवसेनेने आणि राजशिष्टाचार मंत्र्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पायघड्या टाकल्या. त्यांचा दूत म्हणून काम केले. त्यांनी त्यांच्यासाठी बैठका अॅरेंज केल्याचाही संशय आहे. हा महाराष्ट्र द्रोह आहे, अशी घणाघाती टीका गुरुवारी भाजप नेते आशिष शेलारयांनी केली. ते मुंबईत बोलत होते. शिवाय राज्य सरकार परमबीर सिंहांना वाचवत आहे, असा आरोप त्यांनी केला. तुम्ही देशासमोर खोटे का बोलला, याचे उत्तर द्या. हे कायद्याचे राज्य आहे. कायद्याने चाला. तिन्ही पक्ष एकमेकाशी बोलत नाहीत. हेच यावरून दिसत आहे. राज्यातले मंत्री खोटं का बोलत होते, याचे उत्तर द्या, अशी मागणी त्यांनी केली.

आशिष शेलार यांनी मागील सात वर्षात ज्या पद्धतीने मोदी काम करत आहेत ते लोकांना मान्य आहे, असा दावा केला. सत्तेतले लोक त्यांचे दूत म्हणून काम करत असल्याचे दिसून येत आहे. जे पराभूत मनोवृत्तीचे आहेत, ते काय ठरवणार, असा सवाल त्यांनी केला. याचा अर्थ स्पष्ट आहे की, ममता बॅनर्जी ऐकत नाहीत. काँग्रेस आहे हे, ते मानत नाही. आणि शरद पवारांचे ऐकत नाहीत. यांचेच एकमेकांचे पाय एकमेकात असल्याचा आरोपही त्यांनी केला. शेलार पुढे म्हणाले की, शिवसेनेचा महाराष्ट्र द्रोह आता त्यांच्या लक्षात आला आहे. त्यामुळे संजय राऊत पांघरूण घालायचे. हा राजशिष्टाचार ममतांसाठी आहे. तो इतरांसाठी का नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या