सुखदेव डेरेच्या संगमनेरमधील घराचीही पोलिसांनी घेतली झडती ; दोन लाखांपेक्षा अधिक रक्कम हस्तगतपुणे – शिक्षका पात्रता भरती घोटाळ्यातीलआरोपी परीक्षा परिषदेचे माजी आयुक्त सुखदेव डेरेच्या घराची झडती पुणे पोलिसांनी घेतली आहे. पुणे सायबर सेलचे  सहाय्यक पोलिस निरीक्षक कादीर देशमुख यांच्या पथकाने ही झडती घेतली. तब्बल तीन तास झडती घेण्याचे काम सुरु होते. या झडतीत पोलिसांनी दोन लाखांपेक्षा अधिक रक्कम हस्तगत केली आहे. संगमनेर जवळील गुंजाळवाडी परिसरात डेरे यांचे “सुखयश निवास” स्थान आहे. यावेळी पोलिसांनी डेरे यांच्या कुटुंबियांचे जबाबही नोंदवले आहेत.

सुरुवातीपासूनच सुखदेव डेरे यांची कारकीर्द ही गैरव्यवहारांनी व वादांनी बरबटलेली आहे. डेरे यांनी औरंगाबाद येथे शिक्षण उपसंचालक म्हणून दोन वर्षे काम केले. त्यांच्याकडे विभागीय शिक्षण मंडळात अध्यक्षपदाचा अतिरिक्त कारभारदेखील होता. 4 डिसेंबर 2012 ते 16 जानेवारी 2014 अशी दोन वर्षे ते औरंगाबादेत होते. शिक्षण उपसंचालक पदावर असताना संस्थाचालकांच्या दबावात नियमबाह्यमपणे अनेक शिक्षकांच्या पदाला मान्यता दिल्याचा आरोप डेरेंवर झालेला होता. तसेच अनेक शिक्षक संघटनांनी अनेक आंदोलने करून डेरेंनी केलेली नियमबाह्य नियुक्त्यांची प्रकरणे उघड केली होती.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या