पुण्यात राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार - महादेव जानकर
पुणे : राज्यात पुन्हा महापालिकेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. पुणे, मुंबईसारख्या अनेक मोठ्या महापालिकांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी चांगलीच कंबर कसलीय. पुण्यात भाजप त्यांच्या पूर्ण ताकद लावून लढत आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत, तर पुणे महापालिकेच्या निवडणुकीत चंद्रकांत पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अशातच रासप भाजपपासून फारकत घेणार का? असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

पुण्यात रासपने स्वबळावर लढण्याची घोषणा केल्याने भाजपला पहिला धक्का बसला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाची पुण्यात कोणाबरोबर युती होणार नाही, पुणे महापालिकेसाठी 166 जागा रासप लढणार असल्याची माहिती महादेव जानकर यांनी दिली आहे. त्यांनी रासपच्या कार्यकर्त्यांचा मेळावाही घेतला आहे. त्यामुळे राजसप भाजपपासून कायमची फारकत घेणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या