शासकीय यंत्रणेच्या अनागोंदी कारभाराचा बळी ठरलेल्या

मल्हारीच्या कुटुंबाला आर्थिक मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र



पाटस :

दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा येथील महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)8 परिक्षेची तयारी करीत असलेल्या मल्हारी नामदेव बारवकर या २५ वर्षीय तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केली आहे. शासकीय यंत्रणेच्या अनागोंदी कारभाराचा मल्हारी हा बळी ठरला आहे. शासनाने बारवकर यांच्या कुटूंबाला आर्थिक मदत करावी. अशी मागणी दौंड भाजपचे आमदार राहुल कुल यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पत्रव्यवहार द्वारे केली आहे. दरम्यान, आमदार कुल यांनी नुकतीच बारवकर कुटूंबाची भेट घेवून त्यांचे सात्वन केले आहे. 
       मल्हारी बारवकर यांच्या वडीलांने शिक्षणासाठी घेतलेले कर्ज व वारंवार परिक्षा लांबल्यामुळे आलेल्या नैराश्यातून १७ डिसेंबर २०२१ रोजी आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली होती. मल्हारी याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून समोर आले आहे. बारवकर कुटुंबाची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे मल्हारीच्या शिक्षणासाठी असलेली शेती विकल्यामुळे सदर कुटुंब भूमिहीन झाले आहे. त्यातच त्यांचा एकुलता एक मुलगा गेल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परिक्षेची मागील तीन चार वर्षांपासून तयारी करून देखील वारंवार परिक्षा लांबल्यामुळे व इतर अनेक अडचणीमुळे राज्यातील लाखो विद्यार्थी मानसिक तणावाखाली आहेत. शासकीय दुराव्यास्था व संबंधित यंत्रणेच्या अनागोंदी कारभाराला कंटाळून यापूर्वी दौंड तालुक्यातील केडगाव येथील  स्वप्नील लोणकर याने देखील आत्महत्या केली होती.
    शासकीय अनास्था व संबंधित यंत्रणेच्या अनागोंदी कारभाराचा दौंड तालुक्यातील दोन युवकांचा बळी घेतला आहे .मल्हारी बारवकर यांच्या कुटुंबाला शासनाने तातडीने  आर्थिक मदत करावी.अशी मागणी आमदार कुल यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व विरोधी पक्षने देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या