परीक्षा परिषदेचा ढिसाळ कारभार ; टीईटी परीक्षेच्या उत्तरपत्रिका गोडाऊनमध्ये पडून




पुणे – शिक्षक पात्रता परीक्षेतील घोटाळा उघड झाल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा ढिसाळ कारभार समोर आला आहे. परिषदेने टीईटी परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका व महत्त्वाची कागदपत्रे चक्क पत्र्याच्या गोडाऊनमध्ये ठेवल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे केवळ शिक्षक भरतीचा नव्हे तर शिष्यवृत्ती परीक्षा, टायपिंग परीक्षा, डी. एड परीक्षांसह अनेक परीक्षा घेतल्या जातात. विविध परीक्षा केंद्रातून आलेल्या उत्तरपत्रिका परिषदेच्या गोडाऊनमध्ये जमा केल्या जातात. मात्र सर्व उत्तरपत्रिका पुरेश्या जागेच्या अभावी पत्र्याच्या गोडाऊनमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे लाखो  मुलांचे भविष्य अंधारात असल्याचे दिसून आले आहे.

राज्य शासनाचे शिक्षण परिषदेकडे असलेल्या दुर्लक्ष , अधिकाऱ्यांचा कामातील गलतानपणा याचा वेळी वेळी प्रत्यय येत आहे. जागेच्या आभावामुळे उत्तर पत्रिका गोडाऊन मध्ये ठेवण्यात येत असल्याचे कारण परिषद देत असली तरी जागेच्या उपलब्धतेसाठी सरकार आणि परिषद दोघांकडूनही उदासिनता असल्याचे दिसून येते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या