निरगुडसर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आनंदराव वळसे


निरगुडसर : 


आंबेगाव तालुक्यामधील निरगुडसर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आनंदराव वळसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच ऊर्मीला वळसे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाची निवड करण्यात आली. यापूर्वीच्या सरपंच सपनाताई हांडे देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिल्याने उपसरपंचपद रिक्त झाले नंतर आनंदराव वळसे पाटील यांची बिनविरोध निवड ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आली.

यावेळी गटविकास अधिकारी जलिंदर पठारे, सरपंच उर्मिलाताई वळसे, पांढरे भाऊसाहेब, खराडे भाऊसाहेब, भोजने ग्रामसेवक, फकिराशेठ वळसे, रामदास वळसे पा, उद्योजक रामदास थोरात , ग्रा. सदस्य सपनाताई हांडे, दादाभाऊ टाव्हरे, शरद वळसे, शांताराम उमाप, कैलास सुडके, प्राजक्ता वळसे , तृप्ती टाव्हरे, तेजल गावडे, जयश्री थोरात, पोलीस पाटील विठ्ठल वळसे पा, उद्योजक संजय गोरे, शांताराम गावडे, संतोष वळसे पा, तंटामुक्ती अध्यक्ष युवराज हांडे, भाऊसाहेब हांडे, सुरेश आवारी, पत्रकार नवनाथ थोरात, डॉ.अतुल साबळे, डॉ.सुरेश टाव्हरे, गुलाबराव वळसे, सुरेश टाव्हरे, उदय हांडे , भाऊसाहेब वळसे पा, बाळासाहेब येवले, बाळासाहेब मेंगडे, माऊली आदक, समीर मेंगडे, कैलास वळसे ,विक्रम वळसे,व्हॉइस चेयरमन सुमन वळसे, जयसिंग खिलारी ,अशोक मेंगडे ,प्रकाश कटारिया , संजय वळसे, विक्रम मेंगडे , सुभाष टाव्हरे ,रमेश मेंगडे, संतोष मेंगडे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

 वळसे यांनी या अगोदर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष , रामकृष्ण पतसंस्था अध्यक्ष, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणीही उत्कृष्ट काम केले आहे. तसेच आनंदराव वळसे पाटील यांनी कोरोनाच्या काळात गावात कोविड संसर्ग वाढू नहे यासाठी खूप मेहनत घेत घरोघरी जाऊन जनजागृती करण्याचे काम केले आहे. त्यानी केलेल्या कामाबद्दल त्यांचा जेष्ठ नागरिक संघातर्फे आदर्श ग्रामपंचायत सदस्य म्हणून सन्मान देखील करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या