दिल्लीत आज ओबीसी परिषद

 नवी दिल्ली: ओबीसी आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आता देशभरातील ओबीसींना एकत्र करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ओबीसींचा लढा अधिक व्यापक करण्यासाठी भुजबळ यांनी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत भव्य ओबीसी परिषद होणार आहे. या परिषदेला देशातील बडे ओबीसी नेते हजर राहणार असून या परिषदेच्या माध्यमातून छगन भुजबळ हे शक्तीप्रदर्शन करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने आज दिल्लीत ओबीसी आरक्षण परिषद पार पडणार आहे. या परिषदेला राजद नेते लालूप्रसाद यादव आणि ज्येष्ठ नेते शरद यादव यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. सध्या महाराष्ट्रासह देशात ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर या परिषदेत मोठा निर्णय होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या