Breaking : म्हाडाची आजपासून होणारी परीक्षा रद्दमुंबई : म्हाडाच्या विविध पदांसाठी आजपासून घेण्यात येणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. परीक्षेपूर्वी मध्यरात्री त्यांनी ही घोषणा करणारा व्हिडिओ सोशल मीडियात रिलीज केला. सकाळी विद्यार्थी वेगवेगळ्या परीक्षा केंद्रावर पोहोचले. तेथे पोहोचल्या नंतर परीक्षा रद्द झाल्याची माहिती त्यांना मिळाली. एसटी बंद असल्यामुळे खाजगी वाहनाने दुपटीपेक्षा जास्त पैसे खर्च करून परीक्षा केंद्रावर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना गृहनिर्माण विभागाच्या अनागोंदी कारभाराचा फटका बसला.

  शनिवारी रात्री उशिरा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. काही अपरिहार्य कारणामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबद्दल माहिती देणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

यात त्यांनी सांगितलं की म्हाडाची पूर्ण आठवड्यात होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे (Mhada Exam Updates). आज ही परीक्षा होणार नाही. काही अपरिहार्य कारणामुळे आणि तांत्रिक अडचणींमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आता ही परीक्षा थेट जानेवारी 2022 मध्ये घेतली जाईल असंही त्यांनी सांगितलं (Mhada Exam New Date).

पहा व्हिडीओ...
जितेंद्र आव्हाड यांनी यासाठी विद्यार्थ्यांची माफीही मागितली आहे. आज होणारी परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर जावू नये, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासासाठी माफी मागत विद्यार्थ्यांनी सकाळी केंद्रावर जाण्यासाठी स्वतःला त्रास करून घेऊ नये, यासाठी आपण एवढ्या रात्री हा व्हिडिओ शेअर करत असल्याचंही आव्हाडांनी व्हिडिओच्या शेवटी सांगितलं आहे. दरम्यान म्हाडाची परीक्षा आता जानेवारी महिन्यात घेतली जाणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या