Liturature : नवोदितांसाठी सुरू झालेली साहित्य चळवळ सर्वदूर पसरली

 


नेवासा : नवोदितांसाठी सुरू झालेली साहित्य चळवळ आता सर्वदूर पसरली असून ग्रामीण भागातील अनेक नवोदित साहित्यिकांना शब्दगंध ने  प्रकाशात आणले आहे,नेवासा तालुक्यातील नवोदितांनी शब्दगंध मध्ये सहभागी होऊन लिहिते व्हावे, असे आवाहन जेष्ठ साहित्यिक भाऊसाहेब सावंत यांनी केले.

         शब्दगंध साहित्यिक परिषद नेवासा तालुका शाखेची सर्वसाधारण सभा तालुका अध्यक्ष सचिन हुसळे यांच्या अध्यक्षतेखाली लिटल बर्डस स्कुल मध्ये पार पडली. त्यावेळी संस्थापक सचिव सुनील गोसावी, माजी प्राचार्य अशोक ढगे, कार्यवाह प्रा. डॉ.अशोक कानडे, श्रीमती दयाबाई हुसळे आदी उपस्थित होते.

      यावेळी प्रा. डॉ. किशोर धनवटे म्हणाले कि, प्रत्येक माणुस हा साहित्यिक असतो काही लिहितात काही बोलतात तर काही नाट्य रूपांतर करतात. त्या सर्वांना संधी देण्याचे काम शब्दगंध करत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे.

       सचिन हुसळे यांनी तीन वर्षात झालेल्या कार्यक्रमाची माहिती दिली. शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी यांनी शब्दगंध ची पुढील वाटचाल व नवोदितांची पुस्तकं ना नफा ना तोटा तत्वावर प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

यावेळी नेवासा तालुका शाखा अध्यक्षपदी  ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. किशोर धनवटे तर कार्याध्यक्षपदी गणेश निकम यांची निवड करण्यात आली. पुढील प्रमाणे नवीन कार्यकारी मंडळ निवडण्यात आले.

अध्यक्ष - प्रा.डॉ.किशोर धनवटे
कार्याध्यक्ष - गणेश निकम
उपाध्यक्ष - दिगंबर गोंधळी,पांडुरंग रोडगे
सचिव - राजेंद्र गवळी 
सह सचिव - देविदास आगरखं 
खजिनदार - सुधाकर नवथर


कार्यकारणी सदस्य - अनिल चिधे,सागर पंडित,संदिप नांगरे,विजय लोंढे,सुनील पंडित,प्रसिद्धी समन्वयक श्रीनिवास रक्ताटे,सल्लागार - ऍड. बन्सी सातपुते, डॉ. अशोक ढगे, डॉ.दिगंबर सोनवणे, सचिन हुसळे

नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाचे संस्थापक सुनील गोसावी, अध्यक्ष राजेंद्र उदागे,खजिनदार भगवान राऊत यांनी अभिनंदन केले आहे.

 नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाचा सत्कार  दयाबाई  देवदत्त हुसळे यांच्या हस्ते करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या